राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांना गोळ्या घातल्या

पोलिसांकडून परिसरात मोठा बंदोबस्त तैनात

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांना गोळ्या घातल्या

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची आज जयपूरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या श्यामनगर भागातील घरात घुसून काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली.त्यानंतर त्यांना मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. सुखदेव सिंग यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच संपूर्ण पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सुखदेव सिंग गोगामेडी यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. श्याम नगर येथील राहत्या घरी त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली.या घटनेनंतर मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी झाली.परिस्थिती हाताळण्यासाठी तेथे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.सुखदेव सिंग गोगामेडी यांच्यावर कोणी गोळ्या झाडल्या याची अद्याप कळू शकलेले नाही.

हे ही वाचा:

महाराजा यशवंतराव होळकर यांचे मुंबईत स्मारक उभारणार

राष्ट्रीय स्मारकासाठी पुण्यातील भिडेवाडा इतिहासजमा

२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीरवर तुरुंगात विषप्रयोग

राज्यात  ७५ ठिकाणी नाट्यगृह उभारणीसाठी ३८६ कोटींचा निधी देणार

सिंह गोगामेडी हे राष्ट्रीय करणी सेनेशी दीर्घकाळापासून जोडले गेले होते. करणी सेना संघटनेत बराच काळ वाद झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय राजपूत करणी सेना या नावाने स्वतंत्र संघटना स्थापन केली होती. गोगामेडी त्याचे अध्यक्ष होते. पद्मावत चित्रपट आणि गँगस्टर आनंदपाल एन्काउंटर प्रकरणानंतर राजस्थानमध्ये झालेल्या निदर्शनांमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. या मुद्द्यांशी संबंधित त्यांचे अनेक व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

 

दरम्यान, सुखदेव सिंग यांना गोळ्या घातल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.परिस्थिती पाहून संपूर्ण जयपूर शहरात पोलीस हाय अलर्ट मोडवर आले. त्याचबरोबर राज्यातील इतर भागातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हल्लेखोर कोण होते आणि ते कुठून आले याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आली नाहीये.सुखदेव सिंह गोगामेडी हे अनेक दिवसांपासून सुरक्षेची मागणी करत होते.

 

Exit mobile version