राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येतील दोन आरोपींची पोलिसांनी ओळख पटवली आहे.सुखदेव सिंग गोगामेडी यांची मंगळवारी जयपूरमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरात घुसून गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती.
आरोपींपैकी एकाचे नाव रोहित राठौर असे आहे.हा मूळचा मकराना नागौर येथील रहिवासी आहे.तर दुसरा आरोपी नितीन फौजी हा मूळचा हरियाणाच्या महेंद्रगठ येथील आहे.इंडिया टुडेच्या बातमीनुसार,आरोपी नवीन शेखावत, रोहित राठोड आणि नितीन फौजी हे तिघे लग्नपत्रिका देण्याच्या बहाण्याने करणी सेना प्रमुखांची भेट घेतली होती.
हत्येसाठी नवीन शेखावत याने तीन दिवसांपूर्वी प्रतिदिन ५ हजार रुपये भाड्याने एसयूव्ही कार घेतली होती. मालवीय नगर येथील एजन्सीकडून ही कार भाड्याने घेतली होती. आरोपी गोगामेडी यांच्या निवासस्थानी कार सोडून गेले होते. कारमधून दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,जमिनीच्या वादातून ही हत्या झाली असावी.करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंग गोगामेडी हे रोहित गोदाराच्या जमिनीच्या वादात सामील होते.रोहित गोदारा हा कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा सदस्य आहे.गोदारा याने करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या मृत्यूनंतर लगेचच हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.मात्र, पोलीस या प्रकरणाचा अन्य बाजूंनीही तपास करत आहेत.
हे ही वाचा:
१३ डिसेंबरपर्यंत संसदेवर हल्ला करण्याची खलिस्तानी दहशतवादी पन्नुची भारताला धमकी
मुंबईतून ८ तोतया आयकर विभाग अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
ठाकरेंचा विरोध की अदाणी परत या…ची हाळी
अरिजितची हॅट्ट्रिक, कोरियाला नमवून भारताची विजयी सलामी
विशेष म्हणजे गेल्या वर्षी विजेंद्र सिंग या प्रॉपर्टी डीलरची हत्या झाली होती. आरोपी करणी सेनेच्या प्रमुखाचे जवळचे होते. या हत्येचा बदला म्हणून गोगामेडी यांची हत्या केली असावी? त्यामुळे पोलीस या हत्येचाही तपास करत आहेत.