कामावरून काढल्याच्या रागाने महिला अधिकाऱ्याची हत्या करणारा पोलिसांच्या ताब्यात

बेंगळुरूमध्ये राहत्या घरात पीडितेवर चाकूने केले होते वार

कामावरून काढल्याच्या रागाने महिला अधिकाऱ्याची हत्या करणारा पोलिसांच्या ताब्यात

बंगळुरू पोलिसांनी वरिष्ठ सरकारी अधिकारी केएस प्रतिमा यांच्या हत्येप्रकरणी सोमवारी एकाला अटक केली आहे. केएस प्रतिमा यांची ५ नोव्हेंबर रोजी त्यांच्या बेंगळुरूतील राहत्या घरी एका अज्ञाताने चाकूने वार करत त्यांची हत्या केली होती.याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

केएस प्रतिमा या बेंगळुरू येथे वास्तव्यास असून कर्नाटक सरकारच्या अंतर्गत भूवैज्ञानिक म्हणून कार्यरत होत्या.५ नोव्हेंबर रोजी केएस प्रतिमा आपल्या बेंगळुरू येथील घरात एकट्याच होत्या. प्रतिमा यांचे पती त्यांच्या मूळ गावी तीर्थहल्ली येथे सहलीला गेले होते.केएस प्रतिमा या घरी एकट्याच असल्याने संधीचा फायदा उचलत आरोपीने घरात घुसून त्यांच्यावर चाकूने वार करत हत्या केली होती.या हत्येमध्ये मृत प्रतिमाच्या ओळखीच्या अथवा नातेवाईकांचा हाथ असल्याचा पोलिसांचा संशय होता.त्यानंतर पोलिसांनी सोमवारी एकाला ताब्यात घेतले.आरोपीला त्याच्या कामावरून बडतर्फ केल्याच्या नाराजीने त्याने अधिकाऱ्याची हत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक सरकारच्या अंतर्गत काम करणारा आरोपी किरण हा कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता.याला मृत अधिकारी केएस प्रतिमा यांनी त्याच्या कामावरून बडतर्फ केले होते.त्यामुळे त्याने प्रतिमा यांच्या बेंगळुरूमधील राहत्या घरी त्यांची हत्या केली.घटनेनंतर तो बेंगळुरू राज्यातील चामराजनगर जिल्ह्यात पळून गेला होता.तेथून त्याला सोमवारी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटकेबाबत बोलताना बेंगळुरूचे पोलिस आयुक्त बी दयानंद म्हणाले, “प्रतिमा हत्याकांडप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईचे नेतृत्व दक्षिणचे (बेंगळुरू) डीसीपी यांनी केले व आरोपीला माले महाडेश्वरा हिल्सजवळ ताब्यात घेण्यात आले. आरोपी हा ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि त्याला ७ ते १० दिवसांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले होते.”आम्हाला माहिती मिळाली आहे की तो एक कंत्राटी कर्मचारी होता आणि त्याला काही दिवसांपूर्वीच काढून टाकण्यात आले…,” दयानंद पुढे म्हणाले.

हे ही वाचा:

भारतातील ८८ भाताच्या वाणांचे संवर्धन होणार

दिल्लीतील प्रदूषणाच्या गंभीर समस्येमुळे ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना

मुख्यमंत्री योगींनी राहुल गांधी, सलमान, शाहरुखला लोकप्रियतेत टाकले मागे

ग्राऊंड स्टाफला विराटने दिला खास वेळ!

मृत सरकारी अधिकारी केएस प्रतिमा यांच्याबद्दल तिच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणाली, प्रतिमा ही एक अतिशय गतिमान आणि खूप धाडसी महिला होती.छापे असोत वा कोणतीही कारवाई, तिने तिच्या विभागात मोठे नाव मिळविले होते.नुकतेच तिने काही ठिकाणी छापे टाकले. तिने कोणताही शत्रू बनवला नाही.””नवीन नियमांनुसार, तिने तिचे काम केले आणि मोठे नाव कमावले,” ती पुढे म्हणाली.

कर्नाटक सरकारच्या खाण आणि भूगर्भशास्त्र विभागातील उपसंचालक म्हणून काम करणाऱ्या केएस प्रतिमा यांची बेंगळुरू येथील त्यांच्या राहत्या घरी रविवारी ५ नोव्हेंबर रोजी चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती.मृत प्रतिमा यांच्या भावाने त्यांना अनेक वेळा फोन केला, पण प्रतिसाद मिळाला नसल्याने त्याने बहिणीचे घर गाठले तेव्हा केएस प्रतिमा मृतावस्थेत आढळल्या होत्या.दरम्यान, शिवमोग्गा येथून एमएस्सी पदवी घेतलेली प्रतिमा गेल्या दीड वर्षांपासून बेंगळुरूमध्ये काम करत होती. बेंगळुरूमध्ये राहण्यापूर्वी तिने रामनगरमध्ये सेवा केली होती.

Exit mobile version