कर्नाटक राजभवनाला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा फोन!

पोलिसांकडून चौकशी सुरु

कर्नाटक राजभवनाला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा फोन!

सोमवारी रात्री बेंगळुरू पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीने कर्नाटक राजभवनात बॉम्ब ठेवला असून राजभवन उडवून देण्याचा धमकीचा कॉल आला. पोलिसांनी तातडीने बॉम्बशोधक पथक रवाना करून परिसराची झडती घेतली, मात्र काहीही सापडले नाही.महिन्याभरातुन धमकीची दुसरी घटना.

मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरू पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडून कॉल आला आणि त्याने दावा केला की, कर्नाटक राजभवनात बॉम्ब ठेवला आहे, राजभवन उडवून देऊ.त्यांनतर पोलिसांनी त्वरित बॉम्बशोधक पथकाला सोबत घेऊन राजभवनाच्या परिसराची झडती घेतली मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.

हेही वाचा :

हमासची उत्तर गाझामध्ये शरणागती… इस्रायलचा दावा

कॉलेजमधील विद्यार्थी नेता ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री

रुग्णालयाच्या शौचालयात फेकले बाळाला!

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी ६० तास होणार पूजन
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, “हा फसवा कॉल होता. आम्ही अज्ञातांविरुद्ध एफआयआर दाखल करू. काल मध्यरात्री आम्हाला एका अज्ञात नंबरवरून आमच्या कंट्रोल रूमवर कॉल आला की, त्यांनी राजभवनात बॉम्ब ठेवला आहे.आमच्या पथकाने संपूर्ण परिसर छानुन काढला मात्र काही सापडले नाही.त्यामुळे हा कॉल एक फसवा होता.मात्र, आम्ही अधिक तपास करू आणि अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करू.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बेंगळुरूमधील सुमारे ४४ शाळांना निनावी ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाली होती.त्यांनतर अवघ्या १० दिवसानंतर बॉम्बच्या धमकीची ही दुसरी घटना आहे.

 

 

Exit mobile version