लोकसभेपूर्वी कर्नाटक पोलिसांची धडक कारवाई; ७.६ कोटींची रोकड, सोने-चांदी जप्त

ज्वेलर्स मालकाला घेतले ताब्यात

लोकसभेपूर्वी कर्नाटक पोलिसांची धडक कारवाई; ७.६ कोटींची रोकड, सोने-चांदी जप्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कर्नाटकातील बल्लारी पोलिसांनी एका ज्वेलर्सच्या मालकाच्या घरावर छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत ७.६ कोटी रुपयांची रोकड, सोने आणि चांदी जप्त केली आहे. तसेच ज्वेलर्सचे मालक यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे.

कर्नाटकातील कांबळी बाजारातील हेमा ज्वेलर्सच्या मालकाच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईमध्ये एकूण ७.६ कोटी रुपयांची रोकड, सोने आणि चांदी जप्त करण्यात आली आहे. ५.६० कोटी रुपये रोख, तीन किलो सोने, १०३ किलो चांदीचे दागिने आणि ६८ चांदीचे बार कर्नाटक पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी टाकलेल्या मोठ्या छाप्यात जप्त केले आहेत.

हे ही वाचा..

रायगडमध्ये शिवशाही बसचा अपघात, तिघांचा मृत्यू!

काँग्रेसचा गरिबी हटावचा नारा फक्त निवडणुकी पुरताच!

ओवैसींविरोधात लढणाऱ्या माधवी लता यांचे पंतप्रधानांकडून कौतुक

पंजाबमध्ये ५५ वर्षीय महिलेची नग्न धिंड; तिघांना अटक, दोघांचा शोध सुरू

या कारवाईनंतर हेमा ज्वेलर्सचे मालक नरेश सोनी यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या गोष्टी आणि पैसे हे हवाला व्यवहारातून मिळालेले पैसे असल्याचा पोलिसांना संशय आहे. या कथित व्यवहाराच्या अधिक तपासासाठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना संभाव्य हवाला लिंकचा संशय असून त्यांनी कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ९८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपासातील निष्कर्ष पुढील चौकशीसाठी प्राप्तिकर विभागाकडे पाठवले जातील, असे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version