कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथील एका वसतिगृहातील नववीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने बाळाला जन्म दिल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी वसतिगृहाच्या वॉर्डनला निलंबित करण्यात आले असून पोलिसांकडून पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या मुलीने शहरातील एका रुग्णालयात बाळाला जन्म दिला.
पोलिसांनी चौकशीत समोर आले की, ही मुलगी समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात होती.मात्र, ही मुलगी वसतिगृहात सतत गैरहजर असत असे आणि ती वारंवार नातेवाईकांकडे जात असे.गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तिची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली होती, तरीही तिची गर्भधारणा उघड झाली न्हवती.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी आठवीमध्ये शिकत असताना वर्षभरापूर्वी वसतिगृहात रुजू झाली होती.इंडिया टुडेच्या बातमीनुसार, या मुलीचे एका दहावीच्या मुळाशी संबंध होते.हे दोन्ही विद्यार्थी एकाच शाळेत शिकले.तथापि, दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो मुलगा बंगळुरूला निघून गेला.
हे ही वाचा:
सर्वाधिक मौल्यवान कंपनी म्हणून मायक्रोसॉफ्टची ऍप्पलवर मात!
‘डीपफेक’प्रकरणी येत्या सात ते दहा दिवसांत आयटी नियमांत सुधारणा!
दक्षिण आफ्रिकेचा इस्रायलवर नरसंहाराचा आरोप!
रेड सीमधील हुतींच्या कारवायांना आळा घालण्यासाठी अमेरिका- ब्रिटनचा एअरस्ट्राईक
या घटनेवर भाष्य करताना, तुमकूरच्या समाज कल्याण विभागाचे सहसंचालक कृष्णप्पा एस म्हणाले, “मुलगी बऱ्याच दिवसांपासून वसतिगृहात येत नव्हती. ती बागेपल्ली शहरातील काशापुरा येथील आहे. पोटात दुखत असल्याची तक्रार घेऊन ती रुग्णालयात गेली होती.त्यानंतर आम्हाला ही माहिती मिळाली.आम्ही या प्रकरणाच्या चौकशीसाठी आलो आहोत, आम्ही तपास अहवाल सरकारला सादर करू,” असे ते म्हणाले.दरम्यान, त्या मुलाचा शोध घेत असून अधिक तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.