मुख्याध्यापकांनी पालकांसमोर ओरडल्याने विद्यार्थ्याने स्वतःला घेतले पेटवून!

कर्नाटकातील घटना

मुख्याध्यापकांनी पालकांसमोर ओरडल्याने विद्यार्थ्याने स्वतःला घेतले पेटवून!

कर्नाटकातील हावेरी येथील एका मुलाने आपल्या आजीच्या घरी स्वतःला पेटवून घेतले.वर्गात सतत गैरहजर असल्याचे पालकांना मुख्याध्यापकांनी निदर्शनास आणून विद्यार्थ्याला फटकारल्यानंतर ही घटना घडली.बुधवारी घडलेल्या या दुर्घटनेत विध्यार्थी भाजला आहे.

प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजचा (पीयूसी) विद्यार्थी असलेला मुलगा हंगलमध्ये त्याच्या आजीसोबत राहत होता तर त्याचे आई-वडील हावेरी येथे राहत होते.मुलगा शाळेत सतत गैरहजर होता.त्याच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल आणि त्याचा शाळेतील गैरहजेरीपणामुळे चिंतित असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्याच्या पालकांना बैठकीसाठी बोलावले.

हे ही वाचा:

प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करुन अटक करा!

इस्रायल-हमास युद्धविरामत एक दिवसीय वाढ!

‘भारत-अमेरिका अंतराळ मोहिमेसाठी चार अंतराळवीरांना प्रशिक्षण’

बंधुभावानेच त्यांच्यातील दुर्दम्य आशावाद टिकवला

 

या बैठकीत मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याला पालकांसमोर फटकारले.मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याचे परीक्षेचे मार्क शीट, वर्गात सतत गैरहजर राहणे, अभ्यासात लक्ष नसणे अशा गोष्टी मुख्याध्यापकांनी पालकांसमोर उघड केल्या.त्यांनतर मुलाने आपल्या आजीच्या घरी जाऊन स्वतःला पेटवून घेतले.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने त्याच्या कॉलेजच्या प्राचार्यावर छळ केल्याचा आरोप केला होता आणि त्याने स्वतःला पेटवून घेतल्याचे कारण सांगितले होते.पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

 

 

 

 

Exit mobile version