देशविरोधी भाषण करणाऱ्या शर्जिल इमामविरोधात देशद्रोहाच्या खटल्याचे आदेश

देशविरोधी भाषण करणाऱ्या शर्जिल इमामविरोधात देशद्रोहाच्या खटल्याचे आदेश

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ देशविरोधी भाषण करणारा शर्जील इमाम हा आता अडचणीत सापडला आहे. समाजात द्वेष पसरवणाऱ्या इमामवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असा आदेश दिल्लीच्या कडकडूमा न्यायालयाने दिला आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नागरिकत्व नोंदणी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, शर्जील इमाम याने १३ डिसेंबर २०१९ रोजी जामिया मिलिया इस्लामिया आणि १६ जानेवारी २०२० रोजी अलीगड मुस्लिम विद्यापीठात समजात तेढ निर्माण होईल अशी भाषणे दिली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्याला २८ जानेवारी २०२० रोजी बिहारमधून अटक केली होती. तेव्हापासून शर्जील हा दिल्लीतील तिहार तुरुंगात आहे. या प्रकरणाची सुनावणी स्थानिक कडकडूमा न्यायालयात सुरू आहे.

हे ही वाचा:

वनडे मालिका विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू म्हणतो जय श्री राम

वर्ध्यात भीषण अपघात; आमदाराच्या मुलासह ६ विद्यार्थी ठार

राज्यातील ८९ टक्के नमुने हे ओमायक्रोन बाधित; आठव्या चाचणीचे निष्कर्ष

रेल्वेचालक अडीच तास निवांत झोपला आणि गाडी लेट झाली!

शर्जील इमाम याने मुस्लीम समाजाला रस्ते, महामार्ग जाम करून सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत करण्यासाठी प्रेरित केले होते. आसाम आणि ईशान्येकडील राज्यांना देशाच्या इतर भागांपासून वेगळे करण्याची धमकीही त्याने दिली होती. त्याच्या या भाषणांप्रकरणी शर्जील इमामवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. दिल्लीत इमामविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या १२४अ, १५३अ, १५३ब, ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version