पूर्व उपनगरातील गुन्हेगाराची ‘गॉडमदर’ लेडी डॉन करीना शेख उर्फ आपाला दरोड्याच्या गुन्ह्यात मालाड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. या लेडी डॉनची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पश्चिम उपनगरातील मालाड पश्चिम येथे २८ ऑगस्ट रोजी एका फॉरेक्स एक्सचेंजचे कर्मचारी प्रतीक भोजने आणि गणेश तळवटकर हे दोघे दोन वेगवेगळ्या बॅगमध्ये ठेवलेले ५० लाख आणि २५ लाख रुपये घेऊन त्यांचे मालक भाविक पटेल यांच्या मार्वे रोडवरील घरी ऑटोरिक्क्षाने निघाले होते.
जेव्हा दोघे बॅग घेऊन पटेल यांच्या इमारतीत पोहोचले, तेव्हा तीन जण दुचाकीवरून तेथे आले. त्यातील दोघे खाली उतरले आणि एकाने चाकू काढून भोजने यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दरोडेखोराने तळवटकर यांना धक्काबुक्की केली.नंतर, त्यांनी दोन पिशव्या हिसकावून मोटारसायकल वरून पळ काढला होता. याप्रकरणी मालाड पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून सप्टेंबर महिन्यात पोलिसांनी या दरोड्याचा गुन्हा दाखल करून एका कर्मचाऱ्यासह सात जणांना अटक करण्यात आली होती. हा दरोडा लेडी डॉन करीना शेख हिच्या सांगण्यावरून टाकण्यात आल्याचे चौकशीत समोर आल्यानंतर मालाड पोलिसांनी करीना शेख उर्फ आपा हिला अटक करण्यात आली आहे.
करीना हिच्यावर पूर्व उपनगरात अनेक गंभीर गुन्हे दाखल असून पंतनगर कामराज नगर मध्ये करीना आपा हिची दहशत आहे. खून, खंडणी, खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी टोळ्या चालवणे, बेकायदेशीर झोपड्या बांधून विकणे यासारखे अनेक गुन्हे तिच्यावर दाखल आहे.
हे ही वाचा:
शरद पवार, राहुल गांधींना मुस्लिम मतं हवीत; पण आम्ही नको!
कॅनडा प्रमुख ट्रुडोच खरे सूत्रधार?
भारत-पाक सामन्यासाठी विमानांचे भाडे ‘हवेत’
उदयनिधीची बकवास सुरूच; राष्ट्रपतींबाबत केले वादग्रस्त विधान !
पूर्व उपनगरातील गॉडमदर ….
खून,खंडणी आणि अवैध शस्त्रास्त्रेचा व्यापार करणे या प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या करीमा शेख उर्फ आपा उर्फ करीमा मुजी शाह ही घाटकोपर मध्ये ‘गॉडमदर’ म्हणून ओळखली जाते. घरातून पळून आलेल्या अल्पवयीन मुलांना तसेच नोकरीच्या शोधात परराज्यातून मुंबईत येणाऱ्या तरुणांना आश्रय त्यांना गुन्हेगारीकडे वळवणाऱ्या करीना शेख ही या तरुणांसाठी आपा आणि मम्मी म्हणून ओळखली जाते. ती चालवत असलेल्या टोळीतील गुंड आपा, मम्मी या नावाने तिला संबोधतात.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार,करीना शेख मुंबईत नोकरीच्या शोधात येणाऱ्या तरुणांना तसेच घरातून पळून येणाऱ्या अल्पवयीन मुलांना आश्रय देऊन त्यांना चोरी, घरफोडीचे धडे देते. त्यानंतर ही मुले तिच्या इशाऱ्यावरून चोरी, दरोडे आणि चेन स्नॅचिंग करून चोरीचा सर्व ऐवज करीना कडे जमा करतात. करीना शेख ही राहण्यास असलेल्या घाटकोपर पूर्वेकडील कामराज नगर झोपडपट्टी पट्ट्यात बेकायदेशीर घरे बांधण्यास सुरुवात केली. ही घरे भाड्याने देऊन त्यातून येणाऱ्या पैशातून तिचा उदरनिर्वाह चालत होता. पुढे हीच संपत्ती विकून तिने भरपूर पैसा कमावला. २०२० मध्ये मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने तिला शेवटची अटक केली होती त्यानंतर ती जामिनावर बाहेर पडली आणि वर्सोवात राहण्यास आली.