बाबा सिद्दीकीच्या हत्येसाठी एका संशयित आरोपीने मागितले एक कोटी

पोलिस चौकशीतून आली माहिती समोर

बाबा सिद्दीकीच्या हत्येसाठी एका संशयित आरोपीने मागितले एक कोटी

बाबा सिद्दीकीच्या हत्येचे पहिले कंत्राट पनवेल येथून अटक करण्यात आलेल्या राम कनोजियाला देण्यात आले होते, परंतु बाबा सिद्दीकीचे राजकीय वजन बघता राम कनोजियाला हे काम करायचे नव्हते म्हणून त्याने या कामासाठी एक कोटी रुपयांची मागणी केली होती, अशी माहिती अटक करण्यात आलेल्या राम कनोजियाच्या चौकशीत समोर आली आहे.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने शुक्रवारी पनवेल, डोंबिवली आणि अंबरनाथ येथून पाच जणांना अटक केली आहे. राम कनोजिया, नितीन सप्रे, चेतन पारधी, संभाजी पारधी,प्रदीप ठोंबरे या पाच जणांना अटक करण्यात आली होती.

या पाच जणांपैकी नितीन सप्रे हा थेट अनमोल बिष्णोईच्या संपर्कात होता, त्याने शुभम लोणकरला राम कनोजियाचा संपर्क दिला होता.

शुभम लोणकर याने बाबा सिद्दीकीच्या हत्येचे कंत्राट कनोजियाला दिले होते, परंतु बाबा सिद्दीकीचे राजकीय वर्तुळ आणि त्याचे वजन बघून कनोजियाने सिद्दीकीच्या हत्येसाठी एक कोटी रुपयांची मागणी केली होती, जेणेकरून हे काम त्याला देण्यात येऊ नये, कनोजियाने ठरविल्या प्रमाणे शुभमने एवढी मोठी रक्कम देण्यास नकार दिला होता, आणि त्याला या हत्येच्या कटात स्थानिक पातळीवर मदत करण्यासाठी तयार केले होते, अशी माहिती कनोजियाच्या चौकशीत समोर आली.

हे ही वाचा:

बघ माझी आठवण येते का?

बहराइचमध्ये बुलडोझर कारवाईच्या नोटीसनंतर दुकानदारांकडून स्वतःचं बेकायदा बांधकाम पाडण्यास सुरुवात

महायुतीची जागावाटपाची पहिली यादी कधीही जाहीर होणार!

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर

त्यानंतर, लोणकरने उत्तर प्रदेशातून शूटर्सला नेमण्याचा निर्णय घेतला. कनोजिया याने पुढे नमूद केले की लोणकरला विश्वास होता की उत्तर प्रदेशातील व्यक्तींना महाराष्ट्रात सिद्दीकीच्या महत्त्वाची पूर्ण माहिती नसेल आणि ते कमी पैशात हे काम करतील. त्यानंतर लोणकर याने मोहम्मद जिशान अख्तरच्या माध्यमातून या हत्येसाठी उत्तर प्रदेशातील धर्मराज कश्यप, गुरनैल सिंग आणि शिवकुमार गौतम यांची निवड करण्यात आली.

राम कनोजिया आणि इतर चौघांनी हल्लेखोर शिवकुमार गौतम आणि धर्मराज कश्यप यांना स्थानिक पातळीवर मदत केल्याचे समोर आले. शुभम लोणकर आणि इतर दोन संशयित शिवकुमार गौतम आणि झीशान अख्तर यांना लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली असून हे तिघे नेपाळला पळून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version