फरफटत नेलेल्या तरुणीबाबत मैत्रिणीने केले विचित्र विधान, चौकशी होणार

दिल्ली महिला आयोगाने चौकशीची मागणी केली आहे.

फरफटत नेलेल्या तरुणीबाबत मैत्रिणीने केले विचित्र विधान, चौकशी होणार

दिल्लीच्या कांझावाला येथे कारने बारा किलोमीटरपर्यंत फरफटत नेलेल्या मुलीच्या मृत्यूची दिल्ली महिला आयोगाने चौकशीची मागणी केली आहे. आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या प्रकरणात जीव गमावलेल्या पीडितेच्या मैत्रिणीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, पोलिसांनी अंजलीच्या मैत्रिणीला या प्रकरणात पकडले तेव्हा ती टेलिव्हिजनवर मृत अंजलीबद्दल निरर्थक बोलतांना दिसली.त्या पुढे म्हणाल्या की, ज्या मुलीने आपल्या मैत्रिणीला मदत करण्याऐवजी रस्त्यात मरताना पाहिले ती घरी जाऊन झोपली, तिच्यावर विश्वास कसा ठेवायचा?

स्वाती मालीवाल पुढे म्हणाल्या, ‘अंजलीची मैत्रिण टीव्हीवर वारंवार सांगते आहे की अंजलीची चूक होती, त्यामुळे मला जाणून घ्यायचे आहे की ती कशी मैत्रीण आहे, तिची मैत्रीण तिच्या समोरून गाडीखाली आली, ती ओरडत होती. ही मुलगी तिथून पळून जाते आणि घरी आल्यावर झोपी जाते. या पूर्ण प्रकरणाची तिला कोणाला तरी माहिती देणे आवश्यक वाटले नाही. तिने ना पोलिसांना सांगितले ना अंजलीच्या पालकांना सांगितले. त्यावेळी ती स्कूटी उचलून गाडीचा पाठलाग करू शकली असती, निदान तसा प्रयत्न तरी तिला करता आला असता. यातले तिने काहीही केले नाही. उलट ती अंजलीला बदनाम करण्याच्या गोष्टी वारंवार सांगत आहे.

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाड आपली सर्वस्वी श्रद्धा औरंगजेबावर आहे!

सोमालियामध्ये दोन कारमध्ये स्फोट, ९ ठार

सिंधुताई सपकाळ अनाथांची माय

रितेशच्या चित्रपटाने प्रेक्षकांना लावले “वेड”

 

अंजलीच्या मैत्रिणीची चौकशी झाली पाहिजे

स्वाती मालीवाल म्हणाल्या की, अंजलीचा मृत्यू अत्यंत वेदनादायक झाला आहे. तिला दिल्लीच्या रस्त्यावर बारा किलोमीटरपर्यंत ओढले गेले आणि दिल्लीच्या रस्त्यावर तिचा विवस्त्र मृतदेह सापडला. जे दोषी असतील त्यांना फाशी झालीच पाहिजे. दुसरीकडे, स्वत:ला अंजलीची मैत्रिण म्हणवून घेणाऱ्या या तरुणीचीही चौकशी व्हायलाच हवी. आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या प्रकरणी पूर्व जिल्ह्याच्या पोलिस उपायुक्तांना नोटीस बजावली आहे आणि एफआयआरच्या प्रतीसह या प्रकरणात अटकेची माहितीहि मागवली आहे. आयोगाने मुलीला देण्यात आलेल्या सुरक्षेचा तपशीलही मागवला असून यावेळी पुढे खेद व्यक्त करत स्वाती मालीवाल म्हणाल्या की, अशी प्रकरणे रोजच पाहायला मिळत आहेत.

Exit mobile version