मुंबईत राहणाऱ्या प्रेयसीच्या पतीची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर उत्तर प्रदेशात पळून गेलेल्या मारेकऱ्याला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले या हत्येमध्ये पत्नीचा सहभाग आहे का याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रोहित चंद्रशेखर पाल (२३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे राहणारा आहे. कांदिवली पश्चिम एकता नगर येथे राहनारा मनोज चौहान (३२) याच्यावर रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घराजवळच बेछूट गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली होती. या हत्याच्या घटनेनें परिसरात खळबळ उडवून दिली होती. याप्रकरणी कांदिवली पोलिसानी हत्येचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी कांदिवली पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते.
दरम्यान पोलिसांना घटनास्थळा पासून काही अंतरावर बसविण्यात आलेल्या सोईसीटीव्ही फुटेज तपासले असता या सीसीटीव्हीमध्ये घटना कैद झाली होती, तपास पथकाने मारेकऱ्यांची माहिती काढली असता मारेकरी हा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे राहणारा असून तो मनोज चौहान याला ओळखत होता. या हल्ल्यानंतर मारेकरी हा उत्तर प्रदेशात पळून गेला होता अशी माहिती तपास पथकाला मिळाली होती.
तपास पथकाने वेळ न दडवता त्याचा शोध घेत उत्तर प्रदेशातील प्रयागराज गाठले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला नैनी रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेऊन मुंबईत आणले, आरोपीच्या चौकशीत धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
राज्यात शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू
साहीलला केलेल्या निर्घृण कृत्याचा जराही पश्चात्ताप नाही
भांडवलशाहीविरोधी कम्युनिस्ट नेत्याला ५० लाखांची मिनी कूपर पडली महागात
मृत मनोज चौहान हा आरोपीच्या गावातील असून मनोज हा कामासाठी मुंबईत राहत होता, त्याची पत्नी हि गावी प्रयागराज सासू सासऱ्यासोबत राहत होती. मागील चार वर्षांपासून आरोपीचे आणि मृत मनोज याच्या पत्नीचे प्रेमप्रकरण सुरु होते, वर्षभरापूर्वी या दोघांना मनोजच्या कुटुंबीयांनी एकत्र पकडले होते व आरोपी रोहित याला मारहाण करून हे प्रेमप्रकरण थांबविण्यासाठी सांगितले होते. परंतु त्यानंतर देखील या दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते. प्रेमाच्या आड येणाऱ्या मनोज याला ठार करण्याची योजना आखून रोहित पाल याने गावातून एक देशी कट्टा विकत घेऊन १५ दिवस गोळीबाराचा सर्व करून मुंबईत आला होता, व मनोज याला ठार करण्याची संधी शोधात असताना रविवारी सकाळी मनोज दाढी करण्यासाठी घराबाहेर पडला असता दबा धरून बसलेल्या रोहित याने मनोजच्या दिशेने देशी कट्टयातून दोन गोळ्या झाडल्या, या गोळीबारात मनोज हा गंभीर जखमी होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली.
याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी रोहित पाल याला हत्येप्रकरणी अटक केली असून या हत्येत मनोज याच्या पत्नीचा सहभाग आहे का हे तपासण्यात येत असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.