कल्याण:अल्पवयीन मुलीवर अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी!

पोलिसांकडून अधिक तपास सुरु

कल्याण:अल्पवयीन मुलीवर अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी!

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपी विशाल गवळीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याण कोर्टाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावणी. कल्याण क्राईम ब्रांचने आरोपीला शेगावमधून ताब्यात घेतले होते. त्यानंतर मुंबईमध्ये त्याला आणण्यात आले होते.

नवापाडा पोलिसांनी आज (२६ डिसेंबर) आरोपीला कल्याण कोर्टात हजर केले होते. आरोपीची पत्नीलाही कोर्टामध्ये हजर करण्यात आले आले होते. यानंतर कल्याण कोर्टाने आरोपी विशाल गवळीला  जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

१३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आरोपी विशालने अत्याचार करून तिची हत्या केली होती. सोमवार (२३ डिसेंबर) पासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. त्यानंतर तिचा भिवंडीतील बापगाव परिसरातील कब्रस्तानमध्ये मृतदेह विविस्त्र अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी शोध घेत आरोपी विशाल गवळीला शेगावमधून ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, आरोपी विशाल गवळीवर याआधीच बलात्कार, पोक्सो आणि विनयभंगासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.

त्याच्यावर तडीपारचीही कारवाई केली होती, सध्या तो जामिनावर बाहेर होता. या प्रकरणी अल्पवयीन मुलीला रिक्षातून नेणाराही पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी पिडीतेच्या कुटुंबियांची मागणी केली आहे.

हे ही वाचा : 

जम्मू- काश्मीर मधून तीन गो तस्करांच्या आवळल्या मुसक्या; हिंदू- मुस्लिम दंगल भडकवण्याचा होता प्रयत्न

सुप्रिया सुळे म्हणतात, मी यापूर्वी चार निवडणुका ईव्हीएमवर जिंकल्या

बोलण्यात गुंतवून विद्यार्थ्यांचा मोबाईल, सोन्याची अंगठी चोरणारा गजाआड

१७ बांगलादेशीयांना अटक, एटीएसची मुंबई,ठाणे पालघर जिल्ह्यात कारवाई

 

Exit mobile version