कालीचरण महाराज म्हणतात, फाशी दिलीत तरी चालेल

कालीचरण महाराज म्हणतात, फाशी दिलीत तरी चालेल

छत्तीसगड आयोजित धर्म संसदेत संत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याने कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर कालीचरण महाराजांनी एक व्हिडीओ शेअर करत आपण आपल्या वक्तव्यांवर ठाम असल्याचे म्हटले आहे. गुन्हा दाखल केल्यावर २४ तासांच्या आत कालीचरण यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

‘अशा एफआयआरने मला काहीही फरक पडत नाही. मी गांधीविरोधी आहे आणि गांधींचा मी द्वेष करतो. विधानांबाबत कसलाही पश्चाताप नाही. यासाठी मला फाशीची शिक्षा जरी सुनावली गेली तरी मी ती स्विकारेन,’ असे कालीचरण महाराजांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

काय आहे पंतप्रधान मोदींच्या नव्या गाडीची खासियत?

दिनेश मोंगियाचा भाजपात प्रवेश

मोदी सरकारच्या योजनेला यश, चीनला डावलून इंटेल भारतात

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बारगळणार

२६ डिसेंबर रोजी कालीचरण यांनी गांधीजींविषयी अत्यंत खालच्या दर्जाचे शब्द वापरून वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे त्यांनी आभार मानले. मी नथूराम गोडसे यांना सलाम करतो की त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले होते.

कालीचरण महाराज हे मूळचे महाराष्ट्रातील अकोल्याचे असून काही दिवसांपूर्वी सांगलीतही त्यांनी कोरोना महामारीवरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. कोरोना हा फर्जीवाडा आहे. जागतिक आरोग्य संघटनासुद्धा फर्जीवाडा संस्था आहे, असे विधान कालीचरण महाराज यांनी केले होते.

Exit mobile version