कालीचरण महाराजांना अटक

कालीचरण महाराजांना अटक

महात्मा गांधींच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करण्यासाठी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कालीचरण महाराज यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवार ३० डिसेंबर रोजी कालीचरण महाराज यांच्या अटकेचे वृत्त समोर आले आहे. छत्तीसगड पोलिसांनी ही कारवाई करताना कालीचरण महाराज यांना अटक केली आहे.

रायपूर येथे आयोजित धर्म संसदेत महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे कालीचरण महाराज चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांच्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठली होती. पण तरीदेखील ते त्या विधानापासून मागे हटले नाहीत. त्यानंतर देशभरात त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली असून ठीकठीकाणी तक्रार दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या विधिमंडळातही त्यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटताना दिसले होते. तर त्यांच्या अटकेची मागणी जोर धरताना दिसत होती.

हे ही वाचा:

बांद्रा रेक्लेमेशनला कोरोना रुग्ण ‘वाढविण्याची’ सोय?

निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधी पुन्हा परदेशात पळाले

रणझुंजार नव्हे तर घरझुंजार! अतुल भातखळकर यांची टोलेबाजी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा

अशातच रायपूर पोलिसांनी आता कारवाई करत कालीचरण महाराज यांना अटक केली आहे. मध्यप्रदेशातील खजुराहो येथील बागेश्वर धाम इथून कालीचरण महाराजांना ताब्यात घेण्यात आले आहे. रायपुरचे एसपी प्रशांत अगरवाल यांनी या बातमीची पुष्टी केली आहे. रायपूर मधील टिक्रापारा पोलीस स्थानकात कालीचरण महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार कारवाई करताना त्यांना अटक करण्यात आली आहे.

खजुराहो पासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बागेश्वर धाम येथे एका भाड्याच्या जागेत कालीचरण महाराज यांचे वास्तव्य होते. ३० डिसेंबर रोजी पहाटे ४ च्या सुमारास रायपूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आज संध्याकाळपर्यंत त्यांना रायपूर पोलिसांचे पथक रायपूरला घेऊन येणार आहे.

Exit mobile version