स्नॅपचॅटवर मैत्री करत फोटो काढले…

आणि नंतर धमकी देत बलात्कार

स्नॅपचॅटवर मैत्री करत फोटो काढले…

हरियाणातील कैथल जिल्ह्याच्या पुंद्री भागातील एका युवतीने , काही महिन्यांपूर्वी दिल्ली स्थित रहिवासी दीपक याच्याशी तिची स्नॅपचॅटवर ओळख आणि मैत्री झाली होती. दिल्लीतील याच तरुणाने या मुलीशी आधी मैत्री करून नंतर तिचे अश्लील फोटो काढून ते फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली आणि याच धमकीचा हवाला देऊन तिच्यावर अनेकदा  त्याने  बलात्कार केला.एवढेच नाही तर त्या तरुणाने हे काढलेले फोटो समाजमाध्यमांवर पसरवण्याची धमकीही दिली आणि  त्याने तिचे काढलेले अश्लील फोटो सगळ्या समाजमाध्यमांवर पसरवले.

युवतीच्या या  तक्रारीवरून दिल्लीतील  ‘महिला पोलीस स्थानकांत’   दिपक या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या युवतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत वरील  सर्व बाब  म्हंटली आहे. आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही.  दिपक या तरुणाने या  युवतीशी ३० ओक्टोम्बर २०२२  ते ३० जानेवारीपर्यंत अनेकदा तिच्यावर बलात्कार केल्याचे या  युवतीचे म्हणणे आहे. या तरुणाने त्या  युवती वर बलात्कार केल्यानंतर त्याने तिचे काढलेले अश्लील फोटो सगळ्या समाजमाध्यमांवर पसरवले. हा सर्व प्रकार त्या मुलीच्या लक्षात येताच तिने विश्वासात घेऊन आपल्या कुटुंबियांना हि माहिती दिली. यानंतर कैथल पोलीस स्थानकांत या युवतीच्या कुटुंबीयांनी या तरुणाविरुद्ध  तक्रार दाखल करण्यात  आली आहे.

हे ही वाचा:

माझ्या हत्येचा कट  रचला जात आहे

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

इंग्रजी राजवटीचा पाय खिळखिळा करणारा “लाल”

हवाई अभ्यासच्यावेळी सुखोई – मिराज विमाने हवेत धडक

जेरुसलेमच्या प्रार्थनास्थळात घुसुन दहशत वाद्यांचा गोळीबार

या पोलीस स्थानकातील स्थानक प्रभारी डॉ. नन्हीं देवी यांनी याविषयी माहिती देताना सांगितले कि, पुंडरी भागातील या युवतीला दिल्लीस्थित दीपक नामक तरुणाने मैत्री करून भेटण्याच्या बहाण्याने फोटो काढून नंतर प्रसारमाध्यमां वर पसरविण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिचे फोटो सुद्धा समाजमाध्यमांवर पसरविले घाबरून तिने हि सर्व बाब आपल्या कुटुंबियांना सांगून त्यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. आरोपी दीपक विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध चालू आहे. संपूर्ण प्रकरणाचा पोलीस पुढील तपस करत आहेत.

Exit mobile version