26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामाकबड्डी खेळता खेळता तो कोसळला आणि...

कबड्डी खेळता खेळता तो कोसळला आणि…

Google News Follow

Related

तामिळनाडू येथील पनरुतीजवळ मणदिकुप्पम गावात एका खेळाडूचा कबड्डी सामन्यादरम्यान एक अघटित घटना घडली.

जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तामिळनाडूत जिल्हा पातळीवर कबड्डी सामना चालू असताना खेळाडू विमलराज याचे निधन झाले. कबड्डी सामना रविवारी झाला असून, संबंधित घटनेची माहिती मंगळवारी उघड झाली.

विमलराज कबड्डी सामन्यात जेव्हा प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात जेव्हा डाव खेळायला गेला तेव्हा विरोधी संघाने विमलराजला घेरले आणि जमिनीवर खाली पाडले. त्यादरम्यान, एका खेळाडूचा पाय विमलच्या छातीवर पडला त्यानंतर तो जागेवरून उठलाच नाही. यातच त्याचा श्वास कोंडून जागीच मृत्यू झाला. खेळाडू विमलला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, पण तिथे डॉक्टरांनी विमलला मृत घोषित केले. पोलिसांनी विमलचं पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. परंतु अहवालामध्ये मृत्यू हृदविकारांच्या झटक्याने झाल्याचे समजते, पोलीस यंत्रणा संबंधित घटनेमध्ये घातपाताची शक्यता आहे का? याचा शोध घेत आहेत. विमलराजच्या मृत्यू नंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा:

सिव्हील इंजिनिअर डिप्लोमा केलेल्यांना कंत्राटदार नोंदणीसाठी हिरवा कंदील

मध्य प्रदेशातही ‘सर तन से जुदा’चा प्रकार?

‘खोबरे गेले करवंटी हातात राहिली आतातरी शहाणे व्हा’

शिवसेना म्हणजे ठाकरे अँड सन्स..

 

संबंधित घटनेचा व्हायरल व्हिडिओ समाज माध्यमावर चर्चेत असून, नागरिक खेळाडूप्रती दुःख व्यक्त करताना दिसत आहेत. विमलच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांचाही एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये विमलच्या पार्थिवासोबत त्याचे वडील त्याने जिंकलेली ट्रॉफीही पुरताना दिसत आहेत.

तज्ज्ञांचे मत…

कबड्डीतील तज्ज्ञांनी या विषयी नाराजी व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते खेळाडू चुकीचे व्यायाम, आहार पथ्य न पाळणे, सरावाची कमतरता, चुकीचे मार्गदर्शन, वैयक्तिक ताण, अपुरी झोप इत्यादी अनेक बाबींमुळे अशा अघटित घटनांना सामोरे जाऊ शकतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा