दिल्लीच्या मद्यधोरणातून लाभ होण्यासाठी बीआरएसच्या नेत्या के. कविता यांनी ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांशी संगनमत केले होते. त्या बदल्यात के. कविता आणि अन्य काही जणांनी ‘आप’ला १०० कोटी रुपयेही दिल्याचा आरोप ईडीने केला आहे.
हे ही वाचा:
४०० पार करण्याचा मार्ग दक्षिणेतून जातो!
नारायण मूर्ती यांच्याकडून चार महिन्यांच्या नातवाला २४० कोटी किमतीच्या शेअर्सची भेट
केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांचा राजीनामा
तामिळनाडूत पीएमकेची ‘एनडीए’ला साथ; भाजपासोबत युती करून जागावाटप निश्चित
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविता (४६) यांना ईडीने गेल्याच आठवड्यात अटक केली होती. त्या २३ मार्चपर्यंत ईडीच्या ताब्यात असतील. ईडीने केलेल्या दाव्यानुसार, दिल्लीच्या मद्यधोरणातून लाभ व्हावा म्हणून के. कविता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १०० कोटी रुपये ‘आप’ला आधीच दिले होते. ईडीने गेल्याच आठवड्यात के. कविता या दिल्ली मद्यघोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि लाभार्थींपैकी एक असल्याचा दावा पीएमएलए न्यायालयासमोर करून त्यांच्या रिमांडची मागणी केली होती. हे मद्यधोरण रद्दबातल करण्यात आले आहे.
के. कविता यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजप तेलंगणात मागील दरवाजाने प्रवेश करू शकत नसल्याने केंद्र सरकार ईडीचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. ईडीने सन २०२२मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर देशभरातील २४५ ठिकाणी तपास केला असून दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि अन्य १५ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी ईडीने एकूण सहा आरोपपत्र दाखल केले असून १२८ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जप्त केली आहे.