धारावी गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेले सात जण होते ‘के’ कंपनीचे

धारावी गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेले सात जण होते ‘के’ कंपनीचे

धारावीत झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने ‘के’ कंपनीच्या सात जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली आहे. या टोळीचा म्होरक्या कलीम सय्यद शेख हा तुरुंगात असून त्याच्या सांगण्यावरून अमीर शेख याच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. ही टोळी कलीमच्या नावाने तयार करण्यात आलेली ‘के’ कंपनीच्या नावाने ओळखली जाते. सोशल मीडियावर के कंपनी कडून अनेक व्हिडीओ टाकण्यात आलेले आहेत.

धारावीतील पीला बंगला या ठिकाणी १२ फेब्रुवारी रोजी सकाळीच राजीव गांधी नगर झोपडपट्टीत राहणारा मोहम्मद वसीम यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. ८ राउंड केलेल्या गोळीबारात मोहम्मद वसीम याला पाच गोळ्या लागल्यामुळे त्याचा दुसऱ्या दिवशी सायन रुग्णालयात मृत्यु झाला होता. याप्रकरणी धारावी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान हल्लेखोरांना आश्रय दिल्याप्रकरणी धारावीतील ड्रग्स माफिया शमा परवेज शेख उर्फ बैचेन आंटीला धारावी पोलिसानी अटक केली होती. तिच्या चौकशीत हल्लेखोरांची नावे समोर येताच मुंबई गुन्हे शाखा कक्ष ५ चे प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर यांनी तात्काळ आपले पथक हल्लेखोरांचा मागावर पाठवले.

गुन्हे शाखा कक्ष ५ च्या पथकाने सर्वात प्रथम साहिल मोहम्मद कलीम शेख याला धारावीतून संशयावरून ताब्यात घेतले असता मोहम्मद कलीम हा फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टाग्राम वरून हल्लेखोरांच्या संपर्कात होता व त्यांना मार्गदर्शन करीत होता. गुन्हे शाखेचे पथक साहिल याला सावज बनवून आरोपी पर्यत पोहोचले आणि एकेक करून सहा जणांना अटक करण्यात आली.

हे ही वाचा:

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन

लवकरच येणार हवेत उडणाऱ्या बस…

पेटीएम, नायका, पीबी आणि झोमॅटो गुंतवणूकदार बुडाले

उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, रवींद्र वायकर बंगल्यांबाबत का बोलत नाहीत?

 

साहिल मोहम्मद कलीम शेख, अफसर आलम अली शेख उर्फ बबलू मुल्ला, सईद शेख उर्फ सईद लंगडा, सद्दाम हुसेन, सोहेल उर्फ सोहेल पापा, यासीन अब्दुला शेख आणि शमा शेख असे अटक करण्यात आलेल्या सात जणांची नावे आहेत. अटक करण्यात आलेले सर्व जण २५ ते ३० वयोगटातील असून धारावी, वडाळा परिसरात राहणारे आहेत.

वर्चस्वाच्या लढाईतून हत्या

के कंपनी तयार करणारा कलीम सय्यद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून,खंडणी, खुनाचा प्रयत्न, ड्रग्स तस्करी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहे. अटक करण्यात आलेले सहा जण आणि तुरुंगात असलेला कलीम आणि हत्या करण्यात आलेला अमीर शेख हे सर्वजण बालपणाचे मित्र आहेत. या सर्वांनी मिळून कलीमला बॉसचा दर्जा देऊन त्याच्या नावाने के कंपनी ही टोळी तयार केली होती. २०२० मध्ये कलीम याला नवीमुंबई च्या नेरुळ येथून २० कोटीच्या ड्रग प्रकरणी डीआरआयने अटक केली होती. तेव्हा पासून कलीम हा आर्थर रोड तुरुंगात बंद आहे. कलीम सय्यद तुरुंगात गेल्यामुळे अमीर शेख स्वतःचे वर्चस्व गाजवू लागला होता. टोळीतील इतरांनी जानेवारी महिन्यात कलीम ची ठाणे न्यायालयात भेट घेऊन माहिती दिली,त्याच वेळी कलीमने ‘अमीर को खतम करो’ असा आदेश दिला होता.

Exit mobile version