ज्ञानवापी सर्वेक्षणाचे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना धमकी

ज्ञानवापी सर्वेक्षणाचे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना धमकी

ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण चांगलेच तापले आहे. त्यादरम्यान, न्यायाधीश रवि कुमार दिवाकर, ज्यांनी यूपीमधील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या आवारात व्हिडिओग्राफी करण्याचे आदेश दिले होते, त्यांना मंगळवार ७ जून रोजी धमकीचे पत्र आले आहे. त्यांनतर न्यायाधीशांच्या सुरक्षेसाठी नऊ पोलिस तैनात करण्यात आले आहेत.सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

न्यायाधीश दिवाकर यांनी अतिरिक्त मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त वाराणसी यांना पत्र लिहून धमकी मिळाल्याची माहिती दिली. त्यांनी अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे की, हे पत्र त्यांना ‘इस्लामिक बिगिनिंग्स मूव्हमेंट’च्या वतीने काशिफ अहमद सिद्दीकी यांनी पाठवले आहे. पोलीस आयुक्त सांगितले की, न्यायाधीशांना नोंदणीकृत पोस्टवरून एक पत्र मिळाले असून त्यात आणखी काही कागदपत्रे आहेत. याबाबत त्यांना नुकतीच माहिती देण्यात आली आहे. त्यांनतर वाराणसीचे पोलीस उपायुक्त वरुण यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

लेडी सचिन तेंडूलकरची क्रिकेटमधून निवृत्ती!

बारावीत पुन्हा मुलीच अव्वल; ९४ टक्के निकाल

‘शिवसेनेची बी टीम कोणती हे स्पष्ट’

विधानपरिषदेसाठी भाजपाकडून ‘ही’ पाच नाव निश्चित

२६ एप्रिल रोजी न्यायाधीश दिवाकर यांच्या न्यायालयाने ज्ञानवापी परिसराचे व्हिडिओ सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. या पाहणीचा अहवाल १९ मे रोजी न्यायालयात सादर करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना धमकीचे पात्र मिळाले आहे. त्यामुळे न्यायाधीश दिवाकर यांच्या सुरक्षेसाठी एकूण नऊ पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या सुरक्षेचा वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. न्यायाधीशांना पाठवलेले पत्रही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Exit mobile version