वानखेडे स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामना पाहण्यासाठी गेलेल्या एका मुख्य न्यायाधीशांचा महागडा अॅपल आयफोन १४ चोरीला गेला. चर्चगेट परिसरात असलेल्या स्टेडियमच्या बाहेर ही घटना घडली. न्यायाधीश हे कुटूंबासोबत आयपीएल क्रिकेट सामना बघण्यासाठी गेले त्यावेळी अज्ञात चोरट्यानी त्यांचा मोबाईल फोन चोरला. पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसां सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मुंबई न्यायालयात कार्यरत आहेत. त्यांनी २०२३ मध्ये, वैयक्तिक वापरासाठी निळा रंगाचा अॅपल आयफोन १४ खरेदी केला होता. १७ एप्रिल २०२५ रोजी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील रोमांचक आयपीएल सामन्यादरम्यान ही चोरी झाली. संध्याकाळी ७:१५ वाजता, मॅजिस्ट्रेट, त्यांच्या पत्नी, मुलगा आणि इतर कुटुंबातील सदस्यांसह, सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमच्या गेट क्रमांक १४ वर पोहोचले. त्याच क्षणी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पॅन्टच्या खिशातून आयफोन चोरल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा:
डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर काय म्हणाले राज ठाकरे?
फोन हरवल्याचे लक्षात येताच, न्यायाधीश यांनी परिसरात शोध घेतला परंतु त्यांना मोबाईल मिळून आला नाही. चोरीला गेल्याचा संशय आल्याने, त्यांनी मुंबई पोलिसांच्या ऑनलाइन पोर्टलवर ई-तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे, मरीन ड्राइव्ह पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.