माजी खासदार छत्रपती संभाजीराजेंवरील टीकेनंतर जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला

स्वराज्य संघटनेने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

माजी खासदार छत्रपती संभाजीराजेंवरील टीकेनंतर जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. काही दिवसांपूर्वी विशाळगडावर झालेल्या दंगलीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती. संभाजीरांजेंच्या अंगात छत्रपती शाहू महाराजांचे रक्त वाहत आहेत का? हे तपासावे लागेल, असे विधान आव्हाड यांनी केले होते. या विधानानंतर संतप्त स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला केला.

आमदार जितेंद्र आव्हाड ठाण्याच्या दिशेने जात असताना तीन ते चार जणांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. गाडीचा वेग कमी होताच हातातील काठ्यांनी त्यांनी वाहनांवर हल्ला केला. स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ल्या केल्याचे समोर आले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान केला आहे, अशी भूमिका स्वराज्य संघटनेने मांडली आहे. जितेंद्र आव्हाडांनी माफी मागावी, अशी मागणी देखील स्वराज्य संघटनेने काही दिवसांपूर्वी केली होती.

या हल्ल्यानंतर स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडीओत स्वराज्य संघटनेचा एक कार्यकर्ता आपण या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचं सांगत आहे. “युवराज छत्रपतीराजे यांचे रक्त तपासावं लागेल की ते छत्रपती घराण्यातील आहे का, अशा प्रकारचं छत्रपतींच्या घराण्याशी बेताल वक्तव्य केलं, जितेंद्र आव्हाड मर्द असता तर पळाला नसता ही सर्वात मोठी बात महाराष्ट्राला समजली आहे की, तुम्ही पळपुटा आहेस. स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे”, अशी प्रतिक्रिया स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिली आहे.

हे ही वाचा:

केजरीवालांच्या शासकीय निवासस्थानी गुंड फिरतोय का? बिभव कुमार प्रकरणी न्यायालयाचा सवाल

नेमबाज स्वप्नील कुसाळेचा पराक्रम; खाशाबा जाधवांनंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदक !

अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणात होणार वर्गीकरण

आत्मघाती बॉम्बस्फोटाचा तज्ज्ञ खालेद होणार हमासचा प्रमुख !

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

“संभाजीराजेंना छत्रपती म्हणणं सोडून द्या. कारण त्यांना जो अधिकार होता, त्यांची जी वंशपरंपरा होती, ज्या वंशाचं रक्त ते पुढे घेऊन जात होते त्या रक्तात काय होतं आणि यांच्याकडे काय आहे? हे तपासण्याची गरज आहे. शाहू महाराजांच्या घराण्यातील माणूस असं वक्तव्य करतो ज्यामुळे दंगल होऊ शकते तो शाहू महाराजांचा वारसदार होऊच शकत नाही,” असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.

Exit mobile version