बिष्णोई गँगकडून जितेंद्र आव्हाडांना धमकी

फोन करणाऱ्याने मागितली लाखोंची खंडणी

बिष्णोई गँगकडून जितेंद्र आव्हाडांना धमकी

बॉलीवूड अभिनेता सलामान खान याच्या घराजवळ झालेला गोळीबाराचे प्रकरण ताजे असताना आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धमकी देण्यात आली आहे. सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या गोळीबार घटनेची जबाबदारी सोशल मीडियाच्या माध्यमातून बिष्णोई गँगने घेतली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटकही केली आहे. त्यानंतर आता शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड या गँगच्या रडारवर आले आहे. या गँगने त्यांना धमकी दिली आहे. तसेच लाखो रुपयांची खंडणी मागितली आहे.

सलमान खानचे प्रकरण शांत होत नाही, तोच आता जितेंद्र आव्हाड यांना धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन आला आहे. धमकी देणाऱ्याने लाखो रुपयांची खंडणी मागितली आहे. तसेच पैसे न दिल्यास सलमान खान सारखे होणार असल्याचे धमकी देणाऱ्याने म्हटले आहे. त्याने आपले नाव रोहित गोदारा म्हटले असून हा फोन ऑस्ट्रेलियातून आला आहे. दरम्यान, या प्रकरणात जितेंद्र आव्हाड पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहेत.

हे ही वाचा:

अमेरिकेचा पाकला झटका, क्षेपणास्त्र निर्मितीसाठी मदत करणाऱ्या कंपन्यांवर बंदी!

बिहारच्या चंपारणमध्ये ‘लव्ह जिहाद’!

काँग्रेस बेकायदा, घुसखोर मुस्लिमांमध्ये संपत्तीचे वाटप करेल!

ममता सरकारला मोठा झटका, कोलकाता उच्च न्यायालयाने शिक्षक भरती केली रद्द!

लॉरेंस बिष्णोई हा पंजाबमधील गँगस्टर आहे. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. पंजाबी गायक सिद्धू मूसवाला याची हत्या या गँगने केली होती. या गँगमधील दोघांनी मागील आठवड्यात सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पाच राऊंड फायर केल्या होत्या. या प्रकरणात तपासासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली आहेत. या प्रकरणातचं आता गुजरात कनेक्शन समोर आले आहे. आरोपींनी वापरलेली पिस्तुल तापी नदीत टाकल्याची कबुलीही दिली आहे. यावरून पुढे तपास सुरू आहे.

Exit mobile version