जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

आव्हाड यांच्यासह या प्रकरणातील १२ जाणांनाही जामीन

जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

ठाण्यातील विवियाना मॉल प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आव्हाड याना दिलासा मिळाला आहे. आव्हाड यांच्यासह या प्रकरणातील १२ जाणांनाही जामीन देण्यात आला आहे. न्यालयाने कोणत्याही पुराव्यानिशी छेडछाड न करसाच्या अटींसह हा जामीन मंजूर केला आहे.

विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना चित्रपटगृहात घुसून आमदार आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी बाहेर काढत मारहाण केली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना शुक्रवारी अटक केली होती. या प्रकरणी आव्हाड यांना शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारी वकिलांनी आव्हाडांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ही अटक बेकायदेशीर असल्याची बाजू आव्हाड यांच्या वकिलांनी मांडली . दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सुनावणीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. हा जामीन मंजूर होणार की नाही याबद्दल सर्वाना उत्सुकता लागली होती.अखेर न्यायालयाने आव्हाड यांना दिलासा देतांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्याच वेळी तपासासाठी सहकार्य करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, १२ हजार रोजगार होणार निर्माण

‘या’ कारणामुळे ट्विटरच्या ‘ब्लू टिक’ पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय मागे

आरेमध्ये बिबट्याचा महिलेवर जीवघेणा हल्ला

गजानन कीर्तिकरांचा उद्धव गटाला रामराम ; शिंदे गटात सामील

कांगावा करणे आव्हाडांची स्टाईल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाड यांच्या जामिनावर प्रतिक्रिया दिली आहे . कांगावा करणे ही आव्हाड यांची स्टाईल आहे असा टोला त्यांनी लगावला. कोणत्याही गोष्टीचे ते उद्दात्तीकरण करतात. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह जाऊन थिएटरमध्ये जो तमाशा केला, मारहाण केली त्यामुळे कारवाई झाली. दुसरं योनी असतं तरी हेच केलं असतं असे मुख्यमंत्री म्हणाले.

Exit mobile version