सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून नाशिकच्या चांदीच्या गणपतीचे दागिने लंपास

सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश

सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून नाशिकच्या चांदीच्या गणपतीचे दागिने लंपास

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून दागिने व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लूटमारीच्या घटनाही घडल्या आहेत. नाशिकच्या गजबजलेल्या कारंजा परिसरातील प्रसिद्ध चांदीच्या गणेश मंदिरातून मूर्तीचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वर करून चोरटयांनी हे दागिने घेऊन पोबारा केला. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. त्यामुळे नाशिक पोलिसांना या चोरीचा छडा लावण्यात यश आले आहे. पोलिसांनी निहाल यादव याला या प्रकरणी अटक केली आहे.

चांदीच्या गणेशाचे मंदिर हे नाशिक शहरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सिद्धिविनायक मंदिर म्हणूनही हे मंदिर परिचित आहे. रविवारी पहाटे हा चोरटा गणेश मंदिरामध्ये शिरला. गणपतीच्या मूर्तीवरील दागिने चोरून पाळण्याच्या बेतात असतानाच मंदिराच्या सुरक्षा रक्षकाला ही गोष्ट समजली. सुरक्षा रक्षकाने चोरट्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण चोरट्याने त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केला. या हल्ल्यामध्ये सुरक्षा रक्षक जखमी झाला.चोरट्याने ३०० ग्राम सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले.

गस्तीवर असलेल्या पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी चोरट्याचा पाठलाग केला. यानंतर चोरट्याने गंगावाडी परिसरातील गोदावरी नदीत उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने या चोरट्याला बेड्या घालण्यात पोलिसांना यश आले. अटक करण्यात आलेल्या या चोरट्याचे नाव निहाल यादव असे असून तो मूळचा मध्य प्रदेशातील आहे.

हे ही वाचा:

प्रवाशांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या शारुख सैफी विरोधात युएपीए अंतर्गत होणार कारवाई

पायधुनीत तलवार गँगचा धूमाकूळ, दुकानात नाचविल्या नंग्या तलवारी

महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्याला गालबोट, उष्माघातामुळे १० जणांचा मृत्यू

रत्नागिरी बस स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी की त्रासासाठी…

नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. मंगळसूत्र, सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरोडा घालण्याचीही प्रकार होत आहेत. चांदीच्या गणेश मंदिरातील चोरीच्या घटनेनंतर नाशिकरांची चिंता वाढली आहे. मंदिरातील मालमत्तेचा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस काय उपाय करणार असा प्रश्न नाशिककर विचारत आहेत.

Exit mobile version