25 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरक्राईमनामानालासोपाऱ्यात भर दिवसा सराफाची हत्या करून दुकानाची लूट

नालासोपाऱ्यात भर दिवसा सराफाची हत्या करून दुकानाची लूट

Google News Follow

Related

नालासोपारा येथे एका सराफाच्या दिवसा ढवळ्या झालेल्या खुनामुळे सारे शहर हादरून गेले आहे. किशोर जैन असे या मृत सराफाचे नाव आहे. नालासोपारा शहरात त्यांचे साक्षी ज्वेलर्स नावाचे दुकान होते. भर दिवसा झालेल्या या लूटमार आणि हत्याकांडामुळे राज्यातील व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आज शनिवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी किशोर जैन यांनी नेहमी प्रमाणे आपले दुकान उघडून व्यवसाय सुरू केला. सकाळची वेळ असल्यामुळे दुकानात अन्य कर्मचारी नव्हते. जैन हे आपल्या दुकानात पूजा करत असताना त्यांच्या दुकानावर दरोडा घालण्याच्या हेतूने दोन इसम आले आणि दुकानात घुसले. त्या दोघांनी किशोर जैन यांच्याकडे लॉकरची चावी मागितली.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानातील भारतीय सुखरूप! कोणाचेही अपहरण नाही

सीताराम कुंटे यांनीच टॅपिंगला मंजुरी दिली होती, मग…

मनसुख हिरेन नंतर कळवा खाडीत सापडला आणखीन एका उद्योजकाचा मृतदेह

अनिल देशमुखांना वॉरंट बजावणार का?

स्वाभाविकपणे किशोर जैन यांनी चावी द्यायला नकार दिला. या दोघांनीही किशोर जैन यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून चावी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण किशोर काही बधले नाहीत. अखेर या दोन चोरट्यांनी किशोर जैन यांच्यावर चाकूचे वार करत त्यांची हत्या केली. जैन यांचा खून करून नंतर त्यांच्या दुकानातून लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेण्यात आला.

या घटनेमुळे साऱ्या शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांच्या हाती साक्षी ज्वेलर्स या दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज लागले असून या फुटेजच्या आधारे त्यांनी या दोन्ही खुन्यांचा तपास चालू केला आहे. तर या आधी आजच ठाण्यातील भरत जैन या सराफाचा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे राज्यातील व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न खूपच चर्चेत आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा