पुणे शहरात आयकर विभागाकडून जोरदार कारवाई सुरू असून पुन्हा एकदा छापेमारी सुरु केली आहे. पुणे शहरातील एका प्रसिद्ध ज्वेलर्सच्या शोरुमवर आणि ज्वेलर्सच्या संचालकाच्या निवासस्थानी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी सुरु केली आहे. पुणे शहरातील हडपसर, मगरपट्टा, बाणेर या भागात ही छापेमारी सुरु असून आयकर विभागाचा मोठा फौजफाटा तपासणीसाठी आला आहे.
गुरुवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ४० वाहनांमधून आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी तपासणीला सुरुवात केली. हे पथक पुणे येथील निळकंठ ज्वेलर्सकडे तपासणी करत आहे. पुणे येथील पत्र्या मारुती चौक येथील त्यांच्या सराफी दालनावर आयकर विभागाचे अधिकारी विविध वाहनांमधून दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सकाळी ६ वाजल्यापासून तपासणी सुरू केली.
या पथकात आयकर विभागाचे ५० पेक्षा जास्त अधिकारी होते. या सर्व अधिकाऱ्यांनी ज्वेलर्सच्या शोरुमची तपासणी सुरू केली आहे. पुणे शहरात निळकंठ ज्वेलर्सच्या दहा शाखा आहेत. या सर्व शाखांवर आयकर विभागाने तपासणी सुरु केली आहे. तसेच शोरुमच्या संचालकाच्या निवासस्थानीही पथक पोहचले आहे.
हे ही वाचा:
एकनाथ खडसे आणि कुटुंबियांना १३७ कोटींच्या दंडाची नोटीस
ललित पाटीलच्या दोन महिला साथीदारांना अटक
हॉस्पिटलमधील कर्मचारी, पोलिसांना मॅनेज करण्यासाठी ललित पाटील देत होता पैसे
थरूर केरळात रिमझिमले पण, महाराष्ट्रात ठाकरे का सुखावले?
आयकर विभागाच्या पथकाची चार टीममध्ये विभागणी करण्यात आली असून त्यांनी एकाच वेळी विविध ठिकाणी तपासणी सुरु केली आहे. पुणे शहरात निळकंठ ज्वेलर्सवर ही छापेमारी का सुरु आहे? याचे कारण अद्याप समोर आले नाही. यापूर्वी आयकर विभागाने मे महिन्यात पुणे येथील बांधकाम व्यावसायिकांची तपासणी केली होती. पुणे परिसरातील पिंपरी आणि औंध परिसरात आयकर विभागाने ही छापेमारी केली होती.