विक्रोळी परिसरात पार्क-साईट भागात मेव्हणीच्या लग्नासाठी दागिने खरेदी करण्यासाठी एका ठगाने पोलिसांच्या ओळखीतून सराफराला साडेसहा लाखांनी गंडविल्याची घटना घडली आहे. संबंधित प्रकरणामध्ये विक्रोळी पार्क-साईट पोलीस चौकीत फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून, पार्क-साईट पोलीस या गुन्ह्याविषयी अधिक तपास करीत आहेत.
घाटकोपर परिसरात राहण्यास असलेले सोन्याचे व्यापारी मेहता यांचे विक्रोळी पार्क-साईट परिसरात दागिन्यांचे दुकान आहे. मेहता यांना पार्कसाईट पोलीस स्थानकातील एका ओळखीच्या पोलीस कर्मचाऱ्यांने ११ एप्रिल रोजी फोन कॉल करून त्यांचा मित्र दत्तात्रय कांबळे याला मेव्हणीच्या लग्नासाठी सोन्याच्या दागिन्यांचा खरेदी करायची असल्याची सांगितले. त्यानंतर कांबळे यांनी एका महिलेसोबत मेहता यांच्या दुकानांत पोहोचला.
मेव्हणीच्या लग्नासाठी दागिन्यांच्या दुकानात गेले असता, सराफाकडून सोन्याचे मंगळसूत्र, सोनसाखळी आणि सोन्याच्या अंगठ्या असे एकूण सहा लाख ६२ हजार रुपये किमतीचे ११४.८० ग्रॅम वजनाच्या दागिन्यांची खरेदी केली. दागिने खरेदी केल्यावर बिलाची रक्कम ऑनलाईन माध्यमातून पाठवल्याचे संदेश मेहता यांना दाखवले. मात्र ठगांनी चलाखी केली. व मात्र मेहता यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालीच नाही. काही वेळाने रक्कम जमा होईल असे सांगून, दागिने घेऊन कांबळे तेथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी ही खात्यात पैसे जमा न झाल्याने कॉल करून विचारणा केली असता, गावी असल्यामुळे पैसे ट्रान्सफर होत नसल्याचे सांगितले.
हे ही वाचा:
केजरीवाल विसरले ती लिकर पॉलिसी
नवे नौदल चिन्ह, मोदी आणि पिवळे इतिहासकार
‘एनआयए’ने दाऊद इब्राहिमची लायकीच काढली
‘राज साहेब आपल्या परखड वक्तृत्वाची महाराष्ट्र वाट पाहतोय’
पैशाबद्दल विचारणा केली असता, धनादेशाच्या माध्यमातून, पैसे खात्यात भरत असल्याचे मेहता यांना सांगितले. मात्र तरी सुद्धा पैसे खात्यात जमा न झाल्याने. पैशाबद्दल विचारणा केली असता. आरटीजीएस द्वारे पाठवत असल्याचे सांगितले. तिथेही वेगवेगळी करणं सांगून टाळत असल्याचे समजले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येता मेहता यांनी पार्कसाईट पोलीस स्थानकांत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.