25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरक्राईमनामावर्सोवा चौपाटीवर झोपलेल्याच्या अंगावरून गेली गाडी; दोघांना अटक

वर्सोवा चौपाटीवर झोपलेल्याच्या अंगावरून गेली गाडी; दोघांना अटक

झोपलेली व्यक्ती मृत झाल्याचे कळताच आरोपी पळून गेले

Google News Follow

Related

वरळी हिट अँड रन च्या घटनेला महिना उलटत नाही तोच मंगळवारी वर्सोव्यात हिट अँड रनची घटना समोर आली आहे. वर्सोवा चौपाटी येथे झोपलेल्या दोन जणांना भरधाव जीपने चिरडल्याची घटना सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे, या अपघातानंतर मोटार चालकाने मोटारीसह तेथून पोबारा केला. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मोटार चालकाला अटक करण्यात आली आहे.

गणेश यादव (३५) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणेश यादव हा रिक्षा चालक असून तो वर्सोवा चौपाटी जवळील सागर कुटीर रहिवासी संघ येथे राहण्यास होता.रविवारी रात्री १२ वाजता गणेश यादव आणि तक्रारदार बबलू श्रीवास्तव हे दोघे वर्सोवा चौपाटी येथे अंथरून घेऊन वाळूवर झोपण्यासाठी गेले होते. वर्सोवा चौपाटी हा रहदारीचा नसल्यामुळे गणेश आणि बबलू हे दोघे चौपाटीवर झोपायला गेले होते.

हे ही वाचा:

जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर देशभक्तीचे अप्रतिम दृश्य, ७५० मीटर लांब निघाली ‘तिरंगा रॅली’

नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधक १ हजार ९५० कामांना मंजुरी

शेख हसिनांसाठी बांगलादेशात तुरुंग सज्ज?

विदर्भ- मराठवाड्यात घडणार नवी दूधक्रांती

सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास गणेशच्या अंगावरून एक भरधाव मोटार वेगात गेली, व काही अंतरावर जाऊन थांबली. बबलुच्या उजव्या हाताला आणि चेहऱ्याला काही तरी घासून गेल्यामुळे त्याला जाग आली असता गणेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, व जवळच एमएच -३१ एफई- ३०३३ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची जीप ही मोटार उभी होती, त्यातून दोन इसम बाहेर पडले व त्यांनी गणेश जिवंत आहे का बघितले. गणेशची हालचाल बंद झाल्याची कळताच हे दोघे घटनास्थळावरून पळून गेले.

या अपघाताची माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी कूपर रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी गणेश यादव याला तपासून मृत घोषित केले. वर्सोवा पोलिसांनी या प्रकरणी एमएच -३१ एफई- ३०३३ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची जीप मोटार चालकासह दोन जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. निखिल डोंगरे आणि शुभम या दोघांना अटक करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा