सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी फरार असलेला या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला ठाण्यातून अटक करण्यात आली.
गेले १० दिवस त्याचा शोध सुरू होता आणि त्यासाठी पोलिसानी पथके तयार केली होती. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.
सध्या तो पोलीस उपयुक्तांच्या देखरेखीखाली असून त्याला पुढील चौकशीसाठी मालवणला नेण्यात आले आहे, असे टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे.
आठ महिन्यांपूर्वी हा पुतळा राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आला होता तो कोसळल्यानंतर महाराष्ट्रात संताप व्यक्त केला गेला. त्यावरून राजकारणही झाले. हा पुतळा नेमका कसा पडला याविषयी वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. आता या अटकेनंतर खरे कारण काय ते समोर येईल.
हे ही वाचा:
न्यूटन, लेबनीझ यांच्यापेक्षा ‘माधव’ थोर होते!
‘IC 814’ चा दहशतवादी प्रवाशांना म्हणाला होता, ‘इस्लाम धर्म स्वीकारा!
पॅरालिम्पिकमध्ये २१ वे पदक; महाराष्ट्राचा सुपुत्र सचिन खिलारीला गोळा फेकमध्ये रौप्य
दुष्काळात उपासमारी टाळण्यासाठी वन्यप्राण्यांची कत्तल होणार !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण झाले होते तसेच त्यावेळी मालवणात प्रथमच नौदल दिन साजरा करण्यात आला होता.
आपटेला अटक करण्यापूर्वी या सगळ्या बांधकामाचा सल्लागार चेतन पाटील याला अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात भाजपचे नेते व आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे की पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. आता विरोधकांची तोंडे बंद होतील.
आपटे याला या कामाचा मोठा अनुभव नसल्याचीही चर्चा होती. आता खरे काय हे स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे.