प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने दणका दिला आहे. चेन्नई न्यायालयाने जया प्रदा यांना सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच त्यांना पाच हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. जया प्रदा यांच्यासह त्यांचे व्यावसायिक भागीदार राम कुमार आणि राजा बाबू यांनाही सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
जया प्रदा यांचे चेन्नईमध्ये एक थिएटर होते. चित्रपटगृह तोट्यात जात असल्याने काही वर्षांपूर्वी त्यांनी चित्रपटगृह बंद केले. दरम्यान, थिएटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईएसआयचे पैसे न दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी राम कुमार आणि राजा बाबू यांना देखील दोषी ठरवण्यात आलं आहे. थिएटर कर्मचारी म्हणाले, जया प्रदा यांनी मानधनात कपात केली आणि ईएसआईचे पैसे दिलेच नाही. ज्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. ईएसआयचे पैसे सरकारी विमा महामंडळाला दिले नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
लेबर गव्हर्नमेंट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने चेन्नईमधील एग्मोर मॅजिस्ट्रेट न्यायालयात जया प्रदा, राम कुमार आणि राजा बाबू यांच्या विरुद्ध खटला दाखल केला. त्यानंतर जया प्रदा यांनी आरोप मान्य करत, खटला रद्दल करण्याची विनंती केली होती. तसेच संबंधीत प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर थकलेली रक्कम परत देण्याचे आश्वासन जया प्रदा यांनी दिलं, पण न्यायालयाने जया प्रदा यांची मागणी फेटाळत दंडासह तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
हे ही वाचा:
भाजपा नेत्या सना खान हत्येप्रकरणी आरोपीला अटक
स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची कारागृहातून होणार सुटका
‘न्यूजक्लिक’ प्रकरणी ईडीची उच्च न्यायालयात धाव
जया प्रदा यांनी ‘सरगम’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी कामचोर, तोहफा, शराबी, मकसद, संजोग, आखिरी रास्ता, एलान-ए-जंग, आज का अर्जुन, थानेदार, मां यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.