प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही कायमच तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. पण यावेळी मात्र अशाच एका फोटोमुळे तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जॅकलिनचा एक रोमँटिक फोटोमुळे ती सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण जॅकलिनचा हा फोटो ईडीसाठी मोठा पुरावा ठरण्याची शक्यता आहे.
जॅकलिनचा हा फोटो सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. जॅकलिनचा हा फोटो आहे सुकेश चंद्रशेखर सोबत. सुकेश चंद्रशेखर हा मनी लॉन्डरिंग प्रकरणातील आरोपी आहे. या प्रकरणात सुरवातीपासूनच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नाव पुढे येत होते. तिला या संदर्भात ईडीने चौकशीसाठी बोलावणेही धाडले होते. पण त्यावेळी जॅकलिनने सुकेशला आपण ओळखत नसल्याचे सांगितले होते. पण आता सुकेश सोबतचाच रोमँटिक फोटो व्हायरल झालयामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. तर यामुळे जॅकलिनच्या अडचणी वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा:
परदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या दोघांना मुंबई विमानतळावरून अटक! सापडले एवढे कोटी
गायीच्या शेणापासून अँटी बॅक्टेरियटल कापडाची निर्मिती
चाळीसगावचे वर्दीतले चोर! बघा आमदारांनी केलेले Sting Operation
शिवसेनेच्या खोतकरांची ईडी कडून १८ तास चौकशी
जॅकलिनच्या या फोटोमध्ये ती सुकेश चंद्रशेखर सोबत एका रोमँटिक पोजमध्ये दिसत आहे. सुकेशने जॅकलिनला मागून मिठी मारली आहे. तर तो तिच्या गालाचे चुंबन घेत आहे. तर याचवेळी सुकेश मोबाईल वरून मिरर सेल्फी घेत आहे. सध्या समाज माध्यमांवर या फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे.
सुकेशवर २०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याने जॅकलिनशी मैत्री करताना तिला आपण खूप मोठे उद्योगपती असल्याचे सांगितले होते. तर सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या गाड्याही भेट दिल्या आहेत.