दिल्लीच्या २५ कोटींच्या चोरी प्रकरणी तिघांना अटक!

आरोपीकडून रोख १२.५० लाख रुपये आणि १८ किलो सोने,हिरे जप्त

दिल्लीच्या २५ कोटींच्या चोरी प्रकरणी तिघांना अटक!

दिल्लीतील भोगल भागातील ज्वेलर्सच्या शोरूममधून २५ कोटी रुपयांचे हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती.याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या एका आरोपीकडून १२.५० लाख रुपये रोख आणि १८ किलो सोने आणि हिरे जप्त करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.चोरटयांनी शोरूमचं छप्पर कापून आत प्रवेश करत कोट्यवधी रुपयांचे दागिने केले होते लंपास.

दिल्लीतील जंगपुरा येथील उमराओ सिंह ज्वेलर्स शोरूममधून २५ कोटींची चोरी झाली होती.शोरूमचं छप्पर कापून दुकानात प्रवेश करत चोरटयांनी हिरे दागिने चोरल्याने भागात एकच खळबळ उडाली होती.उमराव सिंह आणि महावीर प्रसाद जैन हे शोरूमचे मालक आहेत.दुकानात २० ते २५ कोटी रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने ठेवण्यात आल्याचं शोरूम मालकानं सांगितलं होत. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी छत्तीसगडमधून तीन आरोपींना अटक केली आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे – लोकेश श्रीवास्तव (मुख्य आरोपी), शिवा चंद्रवंशी आणि एक अज्ञात व्यक्ती असून अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.अटक करण्यात आलेल्या दुर्ग येथील एका आरोपीकडून १२.५० लाख रुपये रोख आणि १८ किलो सोने आणि हिरे जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या या टोळीचा छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशातही अशाच प्रकारच्या चोरीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

कुख्यात गुंड आतिकच्या भावाच्या बेनामी संपत्तीची रहस्ये उलगडली

तरुणाने आत्महत्येचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला हेरले!

‘कॅनडा म्हणजे मारेकऱ्यांचा गड’!

राजस्थानमध्येही भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी?

दिल्ली पोलिसांच्या टीमचे आभार व्यक्त करताना ज्वेलरी शॉपचे मालक महावीर प्रसाद जैन म्हणाले, “आम्ही पोलिसांचे आभार मानतो… आम्ही सर्व पोलिस अधिकाऱ्यांचे आभारी आहोत… दागिने परत मिळेपर्यंत आम्ही जास्त काही सांगू शकत नाही. पण फोटोंवरून आम्ही ओळखू शकतो की ते आमचे दागिने आहेत… आम्ही दिल्ली पोलिस आणि इतर राज्यांतील पोलिसांचेही कौतुक करतो…”
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.रविवारी मध्यरात्री तीन संशयितांनी भोगल येथील उमराव ज्वेलर्स शोरूमचं छप्पर कापून दुकानात प्रवेश करत २५ कोटी रुपयांचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस करत आहेत.

 

 

Exit mobile version