लष्कराचा म्होरक्या अटकेत, जम्मू-अनंतनाग पोलिसांच्या कारवाईला यश

लष्कराचा म्होरक्या अटकेत, जम्मू-अनंतनाग पोलिसांच्या कारवाईला यश

लष्कर-ए-मुस्तफा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हिदायतुल्लाह मलिक याला पोलिसांनी अटक केली आहे. हिदायतुल्लाह मलिक कडून शस्त्रसाठाही ताब्यात घेण्यात आला आहे. लष्कर-ए-मुस्तफा ही लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचीच एक उपशाखा आहे. शनिवार ६ फेब्रुवारी रोजी जम्मू आणि अनंतनाग पोलिसांनी एकत्रित केलेल्या कारवाईत त्यांना यश आलेले आहे. जम्मू अनंतनाग पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे जम्मू मधील दहशतवाद विरोधी लढ्याला आणखीन प्रोत्साहन मिळणार आहे. 

जम्मू-अनंतनाग पोलिसांनी केलेल्या कारवाईत हिदायतुल्लाह मलिकच्या मुसक्या आवळल्या आहेत. हिजयतुल्लाह मलिक ह्याला दहशतवादी म्हणून घोषित केलेले असून तो लष्कर-ए-मुस्तफाचा प्रमुख म्हणून काम करीत होता. हिजायतुल्लाह मलिक याच्याकडे एक पिस्तूल आणि हॅन्ड ग्रेनेड सापडले असून जम्मू अनंतनाग पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहे.

जम्मूचे एसएसपी श्रीधर पाटील यांनी या संबंधीची माहिती दिली आहे. “हिदायतुल्लाह मलिक हा घोषित दहशतवादी असून त्याला जम्मूतील कुंजवाणी भागाजवळ अटक करण्यात आली आहे. त्याला अटक करताना त्याच्याकडे एक पिस्तूल आणि एक हॅण्डग्रेनेड सुद्धा होता. त्याने पोलिसांवर हल्ला कारण्याचा प्रयत्नही केला.” असे पाटील यांनी सांगोतले आहे. मलिक यांनी पोलिसांवर केलेला हल्ला अपयशी ठरला असून पोलिसांनी त्याला जिवंत पकडण्यात यश मिळवले आहे.

Exit mobile version