जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेसंबंधित एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून परफ्युम आयडी जप्त करण्यात आले आहेत.अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवादाचा मोठा कट पोलिसांकडून उधळण्यात आला आहे. या संबंधित जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये पोलिसांनी एका दहशतवाद्याला अटक केली आहे. दहशतवादी संघटनेशी संबंधित एकाला परफ्यूम आरडी बॉम्बसह अटक (Perfume Ied) करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेला आरोपी लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली. १ जुलै रोजी पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. त्याच्याकडून परफ्यूमच्या बॉटलमधील बॉम्ब सापडले आहेत. जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरच्या पोलिसांनी ट्विट करून याची माहिती दिली.
हिंदू मान्यतेनुसार अमरनाथ यात्रा ही सर्वात कठीण यात्रा मानली जाते. असे म्हणतात की ज्याने अमरनाथची यात्रा केली त्याचे जीवन सफल होते. जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थित अमरनाथ गुहा हे जगभरातील भगवान शिवाच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. त्याचा विश्वास इतका आहे की दरवर्षी लाखो लोक आव्हानांना तोंड देत हा प्रवास पूर्ण करत असतात.अशा ठिकाणी कोणतीही विपरीत घटना घडू नये म्हणून पोलीस, सैनदल डोळ्यात तेल घालून आपले कर्तव्य बजावत असतात. याच ठिकाणी पोलिसांनी लष्कर-ए-तोएबा संबंधित एकाला अटक केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सैन्य दलाने श्रीनगरमधील बटमालू बसस्थानकावरून दहशतवादी संघटनेसंबंधित एका साथीदाराला अटक केली.
हे ही वाचा:
अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलाचा २२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू
अमेरिकेतील शाळांमध्ये लवकरच मिळणार ‘हिंदी’चे धडे
समृद्धी एक्स्प्रेसवे अपघात टायर फाटल्यामुळे नाही तर चालकाच्या डुलकीमुळे?
“त्या दुर्दैवी मृतकांना ‘शरदवासी’ म्हणायचे का?”
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या आरोपीकडून चार परफ्यूम आयईडी (Improvised Explosive Device) सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासिर अहमद इट्टू असं आरोपीचं नाव असून तो कैमोह येथील गुलशनाबादचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बटामालू बसस्थानकाजवळून मिळालेल्या माहितीच्या आधारे लष्कर-ए-तोएबा दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या एक आरोपीला अटक करण्यात आली असून सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे.
दहशतवाला अटक करण्यात आल्यामुळे मोठा कट उधळून लावण्यात प्रशासनाला यश आलं आहे. स्फोटक पदार्थ कायद्याच्या कलम ३/५ सह संबंधित कलमांखाली आरोपींविरुद्ध बटामालू पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. १ जुलैपासून वार्षिक अमरनाथ यात्रा सुरू झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये सध्या प्रचंड सुरक्षा ग्रिड तैनात आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सुरक्षा जवानांची करडी नजर आहे.
यापूर्वीही परफ्यूम आयईडी जप्त
या आधीही परफ्यूम आयईडी बॉम्ब जप्त करण्यात आला होता. २ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका सरकारी शाळेतील शिक्षकाकडून परफ्यूम आयईडी जप्त करण्यात आला होता. हा आरोपी लष्कर-ए-तोएबा संबंधित असल्याचं समोर आलं होतं.