दहशतवाद्यांनी पुन्हा टार्गेट किलिंग केली आहे. शनिवारी शोपियान जिल्ह्यात एका काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. पूरण कृष्ण यांच्यावर दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील चौधरी गुंड भागातील त्यांच्या घराजवळ हल्ला करण्यात आला. जखमी कृष्णाला शोपियान रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
शनिवारी सकाळी उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा येथे सुरक्षा दलांनी १६ किलो आयईडी जप्त केले. यामुळे मोठी दहशतवादी कारवाई उधळली गेली. पण शोपियानमधील दहशतवाद्यांचे मनसुबे यशस्वी झाले. पूरण कृष्ण भट यांना गोळ्या घालून ठार करण्यात त्यांना यश आले आहे. ही घटना घडली तेव्हा पुरण घरापासून अर्ध्या किमी अंतरावर असलेल्या कृष्णाबागेत जात होते. त्याचवेळी दबून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. अल्पसंख्याकांवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये यंदा वाढ झाली आहे.
हे ही वाचा:
‘महिला आणि मुलींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय नाही’
दारूच्या नशेत मुलीला फरफटत नेलेला रिक्षाचालक अटकेत
शिंदे फडणवीस सरकारने दिली शेतकऱ्यांना दिवाळी भेट
कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात २२ जणांचा मृत्यू
काश्मिरी पंडिताच्या हत्येनंतर जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. जम्मूमध्ये लोक रस्त्यावर उतरले असून या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत. आंदोलक न्यायाची मागणी करत आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने आंदोलनाची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये लोक घोषणाबाजी करताना दिसतात. या निदर्शनात मोठ्या संख्येने लोक यामध्ये लोक घोषणाबाजी करताना दिसतात. या निदर्शनात महिलांसह मोठ्या संख्येने लोक दिसत आहेत.
दुसरीकडे सुरक्षा दलांनी परिसराची नाकेबंदी सुरू केली आहे. दहशतवाद्यांची संख्या दोन ते तीन असू शकते, असे सांगण्यात येत आहे. शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की पूरन हा कुटुंबातील एकमेव कमावणारा होता. त्यांच्या मागे दोन मुले आणि पत्नी एकटे आहेत. तर दुसरीकडे कुटुंबीयांची अवस्था बिकट आहे. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.