जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी कारवायांना जोर आला असून नुकतीच मोठी कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटनांसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
जम्मू- काश्मीरमधील दहशतवाद्या कारवायांवर आळा घालण्यासाठी जम्मू काश्मीर प्रशासन आणि सैन्य दलाकडून प्रयत्न सुरू असतात. अशातच जम्मू- काश्मीरमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटनांसाठी काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना जम्मू- काश्मीर सरकारने नोकरीवरून काढून टाकलं आहे. हे तीन अधिकारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना माहिती पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांकडूनच दहशतवादाला खतपाणी घातलं जात असल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
3 government officers sacked in J-K for alleged terror links
Read @ANI Story | https://t.co/uKcAVRriNP#IndianArmy #JammuAndKashmir #Terrorism pic.twitter.com/1TtNQExuer
— ANI Digital (@ani_digital) July 17, 2023
हे ही वाचा:
मराठी गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन
वंदे भारत एक्स्प्रेसच्या बॅटरी बॉक्सला आग
दुगारवाडी धबधब्यात १७ वर्षीय तरुण गेला वाहून
आयएसआयला मदत करणाऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक
पाकिस्तानी दहशतवादी संघटनांसोबत सक्रियपणे काम केल्याबद्दल जम्मू-काश्मीर सरकारने तीन अधिकाऱ्यांना सेवेतून हटवलं आहे. काश्मीर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी (PRO) फहिम अस्लम, महसूल अधिकारी मोरब्बत हुसैन आणि पोलीस हवालदार अर्शद अहमद यांच्यावर जम्मू- काश्मीर सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीर सरकारने पाकिस्तानी दहशतवादी संघटनांसोबत काम करणे आणि दहशतवाद्यांना रसद पुरवणे, दहशतवादी विचारसरणीचा प्रचार करणे, दहशतवादी वित्तपुरवठा करणे आणि फुटीरतावादी अजेंडा पुढे करणे या आरोपाखाली तीन कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकलं आहे.