जैश ए मोहम्मदच्या ‘या’ दहशतवाद्याला कंठस्नान

जैश ए मोहम्मदच्या ‘या’ दहशतवाद्याला कंठस्नान

जम्मू-काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मदचा मोठा दहशतवादी अबू सैफुल्लाचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. पुलवामा हल्ल्यात अबू सैफुल्लाचा हात होता, ज्यात ४० जवान शहीद झाले होते. सैफुल्लाचा खात्मा करुन जवानांवरच्या हल्ल्याचा बदला घेतल्याची भावना व्यक्त केली जातेय. अबू सैफुल्ला ऊर्फ अदनान ऊर्फ इस्माईल, ऊर्फ लंबू अशा विविध नावानं काश्मिर घाटीत ओळखला जात होता. पुलवामा जिल्ह्यातल्या त्रालच्या हंगरमर्गमध्ये एन्काऊंटर दरम्यान मारला गेला. अबू सैफुल्लासोबत त्याचा एक सहकारी दहशतवादीही मारला गेला.

अबू सैफुल्ला हा २०१७ पासून काश्मिरमध्ये सक्रिय होता. तो तालिबानशी संबंध ठेऊन होता तसच अतिरेकी मसूद अजहरच्याही खुप जवळचा मानला जातो. लष्करी अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार-१४ फेब्रुवारी २०१९ च्या पुलवामातल्या हल्ल्यासह सैफुल्ला अनेक दहशतवादी घटनांमध्ये सामील होता. लंबू हा रौफ अजहर तसच अम्मार ह्या दहशतवादी म्होरक्यांशीही त्याचे जवळचे संबंध होते. त्यामुळेच लंबूचा खात्मा केल्यानं पाकिस्तानमध्ये बसून भारतात अतिरेकी घटना घडवणाऱ्यांसाठी हा मोठा धडा मानला जातोय.

अबू सैफुल्ला हा वाहनातून चालणाऱ्या स्फोटकांचा जाणकार होता. याचा वापर अफगाणिस्तानमध्ये सर्रास केला जातो. पुलवामात जो २०१९ ला हल्ला केला गेला आणि ४० जवान शहीद झाले, त्यातही असाच स्फोटकांचा वापर केल्याचं सांगितलं जातं. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांना पुन्हा डोकं वर काढलंय. त्याचा थेट धोका भारतालाही आहे, त्याच पार्श्वभूमीर अबू सैफुल्लाला संपवणं महत्वाचं होतं. त्यात यश आलंय.

हे ही वाचा:

‘राष्ट्र प्रथम, नेहमी प्रथम’ ही भावना महत्वाची

केरळ, महाराष्ट्रात तिसरी लाट आली?

कमलप्रीतची कमाल जीत, अंतिम फेरी निश्चित!

आसाम, मिझोराम संघर्षाला ‘हे’ नवं वळण

उपलब्ध माहितीनुसार-अबू सैफुल्ला हा सध्या जैश ए मोहम्मदला मजबूत करण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी तो पुलवामा, त्राल, काकपोरा, पंपोर ह्या क्षेत्रात नव्यानं दहशतवादी तयार करण्यासाठी प्रयत्नशील होता. त्यांचाच वापर त्याला इतर भागात करायचा होता. जो दुसरा दहशतवादी मारला गेला त्याची अजून ओळख पटलेली नाही. घटनास्थळावरुन एक एम-४ रायफल, एके-४७ रायफल, एक ग्लॉक पिस्टल आणि एक इतर पिस्तुल जप्त करण्यात आलंय.

Exit mobile version