दाक्षिणात्य सुपरस्टार यांच्या बहुचर्चित अशा ‘जेलर’ चित्रपटात खलनायकाची भूमिका करणाऱ्या अभिनेता विनायकन याला अटक करण्यात आली आहे. सार्वजनिक जागेत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी विनायकन याला केरळ पोलिसांनी अटक केली.
अभिनेता विनायकन याने दाक्षिणात्य सुपरस्टार याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जेलर’ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. त्याने मंगळवारी एका पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्यामुळे एर्नाकुलम नॉर्थ पोलिसांनी त्याला अटक केली. अटक केल्यानंतर त्याला एर्नाकुलम जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा:
ठाकरे हमास, लष्कर ए तैय्यबाशीही युती करतील!
इस्रायलची अटीतटीची लढाई; आता ‘आकाश-पाताळ’ एक करणार
दसऱ्यानिमित्त भारत- चीन सीमेवर शस्त्रपूजन
महाराष्ट्राला तिरंदाजाची भूमी बनवू
विनायकन याच्यावर सार्वजनिक जागेवर मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. तसेच, पोलिसांच्या कामातही अडथळा आणला. हा अभिनेता जिथे राहतो, त्या जागेत त्याने गोंधळ घातला असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी या तक्रारींची गंभीर दखल घेतली. त्याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. त्याने असभ्य वर्तन केल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याची सुटका करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच, तो मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती नॉर्थ पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनी दिली.