महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी, महाराष्ट्रात “जेल टुरिजम” सुरु करणार असल्याची घोषणा केली. पत्रकारांशी संवाद साधताना देशमुखांनी अशी माहिती दिली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही २६ जानेवारी २०२१ ला पुण्याच्या येरवडा जेलमध्ये “जेल टुरिजम”चे उद्घाटन करणार आहेत.
“पहिल्या टप्प्यात पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये जेल टुरिजम ची सुरवात होईल. तर दुसऱ्या टप्प्यात नागपूर सेंट्रल जेलमध्ये सुरुवात होईल. शालेय विद्यार्थ्यांना ₹५, कॉलेज विद्यार्थ्यांना ₹१० आणि इतर नागरिकांना ₹५० शुल्क आकारण्यात येईल.” अशी माहिती देशमुख यांनी दिली.
५०० एकर परिसरात पसरलेल्या जेलचा काही भाग आम जनतेसाठी खुला करण्यात येणार आहे. यामुळे जेलशी निगडित विविध विषयांचे अध्ययन करणाऱ्या अनेक लोकांना याचा फायदा होणार आहे.
हेही पहा: https://www.newsdanka.com/cartoon/tourism-novelty-in-maharashtra/3922/
ब्रिटिश सरकारच्या काळात महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे स्वातंत्र्य सैनिक येरवडा जेलमध्ये बंद होते. १९९८ मध्ये अण्णा हजारेंनादेखील येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर संजय दत्त यांनाही येरवडा तुरुंगात ठेवले होते.
अंडरवर्ल्ड दोन अरुण गवळी यांनीसुद्धा त्यांच्या गुन्हेगारीची सुरवात याच तुरुंगातून केली तर २६/११ चा दहशतवादी अजमल कसाब याला याच तुरुंगात ठेवण्यात आले होते आणि इथेच फाशीही देण्यात आली होती.