पुण्यातील येरवडा कारागृहात घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. येरवडा कारागृहातील कैद्यांनी अधिकाऱ्याला कारागृहातच बेदम मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. येरवडा कारागृहातील मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचं शेरखान पठाण असं आहे. येरवडा कारागृहात असलेल्या कुख्यात आंदेकर टोळीतील आरोपींनी कारागृह अधिकाऱ्याला मारहाण केली. या मारहाणीत संबंधित अधिकारी गंभीर जखमी झाला आहे.
कारागृह आधिकाऱ्याला मारहाण झाल्यानंतर घटनास्थळी मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक १ मध्ये घडली. विकी कांबळे आणि प्रकाश रेणुसे हे दोघे ही सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. या दोघांनी किरकोळ कारणावरून १० इतर गुंडाना घेऊन शेरखान पठाण यांना मारहाण करायला सुरुवात केली. या घटनेत पठाण यांच्या उजव्या डोळ्याच्या खाली जखम झाली तर उजवा हाथ फ्रॅक्चर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मारहाण करणाऱ्या कैद्यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पठाण यांच्यावर दहा ते बारा जणांच्या टोळक्याने हल्ला केला. त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यामुळे कारागृहात काही प्रमाणात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. दोन दिवसांपूर्वी कैद्यांमध्ये आणि शेरखान पठाण यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती.
हे ही वाचा:
इलेक्टोरल बॉन्ड घटनाबाह्य, सुप्रीम कोर्टाचा निर्णय!
मुलाला कसोटी पदार्पणाची कॅप मिळताच वडिलांना अश्रू अनावर
अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. गोपछडेंना भाजपाची उमेदवारी
काँग्रेसने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी २००७ मध्येच फेटाळल्या होत्या!
येरवडा कारागृहातील इतर अधिकारी या घटनेची माहिती घेत आहेत. संपूर्ण चौकशी केल्यानंतर पठाण यांना मारहाणीचं खरं कारण समोर येईल. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे.