आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाच्या युवा नेत्याची बुधवारी (१७ जुलै) रात्री हत्या करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. पालनाडू जिल्ह्यातील एका रस्त्याच्या मध्यभागी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एका व्यक्ती युवा नेत्यावर चाकूने हल्ला करताना दिसत आहे आणि रस्त्यावरील असंख्य लोक बघ्याची भूमिका बघत असल्याचेही दिसत आहे.
रशीद असे हल्ला झालेल्या युवा नेत्याचे नाव आहे. व्हिडिओमध्ये त्याच्यावर एक व्यक्ती चाकूने हल्ला चढवत आहे. रस्त्यावरील लोक देखील बघ्याची भूमिका करत होते. रक्ताने माखलेला व्यक्ती वारंवार रशीदवर हल्ला चढवत होता. इंडिया टुडेच्या बातमीननुसार, या दुर्घटनेत रशीदला गंभीर दुखापत झाली, त्याचे दोन्ही हात कापले गेले, त्याच्या मानेवर देखील चाकूने वार केला होता. हल्ल्यानंतर रशीदला रुग्णालयात नेण्यात आले मात्र नंतर त्याचा मृत्यू झाला.
हे ही वाचा:
मुस्लीम समाजाची लोकसंख्या १४ वरून ४० टक्यांवर !
सुरतमध्ये ड्रग्जच्या कारखान्यावर छापा, २० कोटींचा कच्चा माल जप्त !
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये पुन्हा चकमक; लष्कराचे दोन जवान जखमी
हाथरस चेंगराचेंगरीवर भोले बाबा म्हणतो, मृत्यू अटळ आहे, ‘आज ना उद्या मरायचे आहे’
दरम्यान, पालनाडू जिल्ह्याचे पोलिस प्रमुख कांची श्रीनिवास राव यांनी इंडिया टुडेला सांगितले की, आत्तापर्यंत या भीषण हत्येमागे वैयक्तिक शत्रुत्वाचा हेतू असल्याचे मानले जात आहे. या घटनेचा कोणत्याही पक्षाशी संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तणाव निर्माण करणाऱ्यांवर किंवा प्रदेशाची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.