मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून जॅकलिन फर्नांडिसचे नाव

देशाबाहेर जाण्यास मनाई

मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून जॅकलिन फर्नांडिसचे नाव

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या अडचणीत वाढ झाली असून खंडणी प्रकरणातील आरोपपत्रात जॅकलिन हिच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने जॅकलिन फर्नांडिसचं नाव आरोपी म्हणून लिहिलं आहे. जॅकलिन हिला याप्रकरणी अद्याप अटक झालेली नाही. मात्र, तिला देशाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

ईडीच्यावतीने दिल्ली न्यायालयात पीएमएलए अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीने जॅकलिनची सुमारे ७ कोटी १२ लाखांची एफडी जप्त केली होती. आता या २१५ कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिनचे नाव आरोपी म्हणून आल्याने तिच्या अडचणीत वाढ झाली असून, या प्रकरणी ईडीकडून जॅकलिनविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणाच्या तपासात सुकेशने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू दिल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर ईडीने त्याच्यावर कारवाई करत सुकेश याची ७ कोटी रुपयांची संपत्तीही जप्त केली आहे. सुकेश चंद्रशेखर हा बंगळुरुतला एक उद्योगपती असून सुरुवातीला नोकरी देण्याच्या आमिषाने त्याने अनेकांची फसवणूक केली होती. निवडणूक आयोगात ओळख असल्याचं सांगून हवं ते चिन्ह मिळवून देण्याचं आमिषही त्याने दाखवलं होतं. याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी त्याला २०१७ मध्ये अटक केली होती.

हे ही वाचा:

प्रचार प्रमुखपदाच्या बेडयांतून ‘गुलाम’ झाले ‘आझाद’

ट्रक- कारच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू

राष्ट्रवादीचा मोठा नेता लवकरच मलिक, देशमुखांच्या सोबतीला

गोविंदाना १० लाखांचे विमा कवच

सुकेश याने जॅकलिनला गिफ्ट म्हणून पाच जनावरं भेट दिल्याचं समोर आलं होतं. त्यातील अरबी घोड्याची किंमत तब्बल ५२ लाख आहे तर प्रत्येकी ९ लाख रुपये किंमत असलेली एकूण ३६ लाखांच्या चार पर्शियन मांजरांचाही समावेश आहे. दरम्यान, जॅकलीन आणि सुकेशचा एक फोटोदेखील समोर आला होता आणि त्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा होत्या.

Exit mobile version