जॅकलिनमागे ईडी पिडा सुरूच, पुन्हा नोटीस

ईडीने पाठवली नोटीस

जॅकलिनमागे ईडी पिडा सुरूच, पुन्हा नोटीस

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अडचणीत सापडली असून दिवसेंदिवस तिच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. सुकेश चंद्रशेखरशी संबंध असल्याकारणाने २०० कोटी रुपयांच्या मनी मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनचे नाव जोडले जात आहे. दरम्यान, ईडीने तिची चौकशी केली होती. आता ईडीने पुन्हा एकदा जॅकलिनला नोटीस पाठवली असून या प्रकरणाबाबत पुन्हा तिची चौकशी करण्यात येणार आहे.

जॅकलिनची या प्रकरणात यापूर्वीही अनेकदा चौकशी झाली होती. जॅकलीनला सुकेश चंद्रशेखरसोबत तिचे असणारे नातेसंबंध आणि त्याच्याकडून मिळालेल्या महागड्या भेटवस्तू यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने चौकशीदरम्यान जॅकलिनने सुकेश चंद्रशेखरसोबत असलेल्या संबंधांची कबुलीही दिली होती.

आरोपांनुसार, चंद्रशेखरने फसवणूक करून मिळवलेल्या या पैशाचा वापर जॅकलिनसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी केला होता. जॅकलिन फर्नांडिसशी मैत्री झाल्यानंतर त्याने जॅकलिनला करोडो रुपयांच्या महागड्या भेटवस्तू दिल्याचा खुलासा सुकेश चंद्रशेखरने केला आहे. यामध्ये गुच्ची बॅग्स, दागिने, महागडे कपडे, कानातले, महागडे शूज, सुपर लक्झरी ब्रँडच्या ब्रेसलेट, बांगड्या, रोलेक्ससारखी महागडी घड्याळे यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

ऑस्ट्रियात पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी वाजले ‘वंदे मातरम’

दारू पिऊन वाहन चालवल्यास लायसन्स होणार रद्द

उत्तर प्रदेशात बसची दुधाच्या टँकरला धडक; अपघातात १८ जणांचा मृत्यू

मराठवाड्यासह विदर्भाला ४.२ रिश्टर स्केल भूकंपाचा बसला धक्का

या मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने सुकेश आणि जॅकलीन यांच्याविरुद्ध यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले होते. जॅकलिनवर फोर्टिसचे माजी आरोग्य सेवा प्रवर्तक शिविंदर सिंग यांची पत्नी आदिती सिंग यांच्याकडून २०० कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे.

Exit mobile version