सुकेश रोज माझ्याशी फोनवर बोलत असे, पण तो तुरुंगातून बोलत होता हे नंतर कळले!

जॅकलिन फर्नांडिसने नोंदवला धक्कादायक जबाब

सुकेश रोज माझ्याशी फोनवर बोलत असे, पण तो तुरुंगातून बोलत होता हे नंतर कळले!

२०० कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसने आपला जवाब नोंदवला आहे. सुकेशशी असलेल्या तिच्या नात्याबद्दल आणि २०० कोटी घोटाळ्याबद्दल जॅकलिनने आपलं मौन सोडलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे २०० कोटींचे मनी लाँड्रिंग प्रकरण आता वेगळंच वळण घेऊ लागलं आहे.

अलीकडेच जॅकलीनने गँगस्टर सुकेश चंद्रशेखर विरोधात पटियाला कोर्टात जबाब नोंदवला असून यावेळी ती म्हणाली की, सुकेशने तिच्या भावनांशी खेळून तिचं करिअर आणि खासगी आयुष्य दोन्हीही उद्ध्वस्त केलं. याबरोबरच तिला सुकेशचं खरं नावसुद्धा माहीत नसल्याचं जॅकलिनने यावेळी स्पष्ट केलं.

गेले काही महीने हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. जॅकलिन फर्नांडिसला मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात नुकतंच पटियाला कोर्टात हजर केलं होतं. यादरम्यान तिने न्यायालयासमोर आपली बाजू मांडली. जॅकलिनने दावा केला आहे की, सुकेश चंद्रशेखर हा सरकारी अधिकारी असल्याबद्दल तिला माहिती दिली होती. शिवाय पिंकी इराणीने तिच्या मेकअप आर्टिस्टला हे देखील पटवून दिले की, ती गृह मंत्रालयातील अधिकारी आहे. इतकंच नव्हे तर सुकेशने स्वत:ला सन टीव्हीचा मालक आणि जे.जयललिता ही त्याची मावशी असल्याचंही त्यावेळेस सांगितलं होतं.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब

जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय

पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण

महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक

या प्रकरणाबद्दल आणि सुकेशशी असलेल्या तिच्या नात्याबद्दल बोलताना जॅकलिन म्हणाली, “त्यान मला फसवलं आणि माझं करिअर उद्ध्वस्त केलं. तो माझा खूप मोठा फॅन आहे आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्याला तिच्याबरोबर काम करायचं आहे असं त्यान मला सांगितलं होतं. दिवसातून किमान ३ ते ४ वेळा आम्ही फोनवर आणि व्हिडिओ कॉलवर बोलायचो. पण तो जेलमधून मला फोन करायचा याची मला पुसटशीही कल्पना नव्हती.”

याशिवाय सुकेशची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पिंकीने तिला सांगितले नाही, असेही जॅकलिन म्हणाली. सुकेशने आपले नाव शेखर असे सांगितले होते. जॅकलिन म्हणाली की सुकेशशी तिचे शेवटचे बोलणे आठ ऑगस्ट २०२१ रोजी फोन कॉलवर झाले होते. त्यानंतर त्याने तिच्याशी संपर्क साधला नाही. त्याच्या या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल जॅकलिनला खूप नंतर समजलं असंही तिन यात नमूद केलं होतं आता या प्रकरणात न्यायलय नेमका काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Exit mobile version