बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा मनी लाँड्रिंग प्रकरणात अंतरिम जामीन १० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने जामीन याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे. गेल्या वेळेप्रमाणे या वेळीही जॅकलिन फर्नांडिस वकिलाच्या वेशात कोर्टात पोहोचली. ठग सुकेश चंद्रशेखर याच्या २०० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात सध्या सुरू असलेल्या ईडीच्या तपासात जॅकलीन ही सहआरोपी आहे. गेल्या सुनावणीतही न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता.
या प्रकरणातील नियमित जामीन आणि इतर प्रलंबित अर्जांवर १० नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. यादरम्यान, न्यायालयाने ईडीला सर्व पक्षांकडून आरोपपत्र आणि इतर संबंधित कागदपत्रे प्रदान करण्याचे निर्देश दिले. सुकेश चंद्रशेखरचा समावेश असलेल्या २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी झाली. पतियाळा हाऊस कोर्टाने २६ सप्टेंबर रोजी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ५०,००० रुपयांच्या जामीनावर अंतरिम जामीन मंजूर केला होता.
सुकेशने जॅकलीनला महागड्या कार आणि महागड्या गिफ्ट्स दिल्या. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांना त्याने कारही भेट दिली. पिंकीने सुकेशची जॅकलिनशी ओळख करून दिली होती. त्या दोघांच्या जाळ्यात ती पूर्णपणे फसली होती आणि तिने लग्न करण्याचेही ठरवले होते. मुंबईत राहणारी पिंकी इराणी हिला सुकेशने आपला एजंट म्हणून बोलावले आणि त्याच्यामार्फत मनमोहक मॉडेलिंग करणाऱ्या मुलींनाही जेलमध्ये बोलावून खोलीत भेटले. भेटल्यानंतर त्यांनी सर्वांना महागड्या भेटवस्तूही दिल्या.
हे ही वाचा:
रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?
ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात
सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’
अजित पवार यांनी का घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?
ठग सुकेश चंद्रशेखरच्या कटात आपला हात नसल्याचेही जॅकलिन फर्नांडिसने जामीन अर्जात म्हटले होते. त्याने कोणते कारस्थान रचले त्यात सहकार्य केले नाही. जॅकलीन म्हणाली की, सत्य हे आहे की आपण स्वतः मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या गुन्ह्याची बळी ठरली आहे.