बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची का केली ईडीने चौकशी? वाचा…

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची का केली ईडीने चौकशी? वाचा…

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची सोमवारी दिल्लीत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) एका मनी लाँडरिंग प्रकरणात साक्षीदार म्हणून तब्बल पाच तास चौकशी केली.

सुकेश चंद्रशेखर या घोटाळेबाजाच्या कोट्यवधीच्या खंडणी रॅकेट प्रकरणात जॅकलिनची ही चौकशी करण्यात आली आहे. ही चंद्रशेखर नावाची व्यक्ती निवडणूक आयोगाशी संबंधित लाचखोरी प्रकरणातही आरोपी आहे.

सक्तवसुली संचालनालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जॅकलिन ही आरोपी नाही, पण सुकेश चंद्रशेखर प्रकरणी ती एक साक्षीदार असल्यामुळे तिची चौकशी करण्यात आली आहे.

२४ ऑगस्टला ईडीने म्हटले होते की, त्यांनी चेन्नईत ८२.५ लाख किंमत असलेला समुद्रालगतचा एक बंगला जप्त केला. शिवाय, डझनावारी किमती कारही ताब्यात घेतल्या. त्याचा चंद्रशेखरच्या मनी लाँडरिंग प्रकरणाशी संबंध होता.

हे ही वाचा:

भारताशी व्यापार करायला तालिबान उत्सुक

महिलांनो शिक्षण घ्या, पण पुरुषांसोबत नाही!

पुन्हा भालाफेकीत भारताला मिळाले सुवर्ण; सुमित अंतिलची जबरदस्त कामगिरी

अनिल परब यांच्या मागे आता नवा ससेमिरा; परिवहन अधिकाऱ्याच्या घरावर छापा

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने केलेल्या एफआयआरच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू झाला. सुकेश चंद्रशेखर हा वयाच्या १७व्या वर्षापासूनच घोटाळे करत होता. त्याच्याविरोधात तेव्हापासून अनेक एफआयआर दाखल आहेत. सध्या तो दिल्लीतील रोहिणी येथे तुरुंगात आहे. अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) या पक्षाचे नेते दिनाकरन यांच्याकडून पैसे घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्याचे हे प्रकरण होते. दोन पानांचे चिन्ह आपल्याकडे राखण्यासाठी एआयएडीएमकेच्या जयललिता गटाचा प्रयत्न सुरू होता. त्यासाठी चंद्रशेखरने ५० कोटींचा व्यवहार केल्याचे म्हटले जाते. त्याच्याकडून १.३ कोटींची रक्कमही ईडीने जप्त केली होती.

 

Exit mobile version