31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामा‘हे हिट अँड रनचे प्रकरण नाही, हा खूनच आहे’

‘हे हिट अँड रनचे प्रकरण नाही, हा खूनच आहे’

अभिनेते जयवंत वाडकर यांनी वरळीतील प्रकरणावर व्यक्त केली तीव्र भावना

Google News Follow

Related

वरळी येथे घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात दारू पिऊन बेफाम गाडी चालवणाऱ्या आणि वरळीतील कावेरी नाखवा या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मिहीर शहाला अटक करण्यात आली आहे, अजूनही या घटनेबद्दलचा लोकांच्या मनात असलेला संताप जराही कमी झालेला नाही.

कावेरी नाखवा या प्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर यांची सख्खी पुतणी होत्या. त्यांच्या झालेल्या या भयंकर मृत्यूमुळे वाडकर यांनाही प्रचंड धक्का बसला आहे. न्यूज डंकाशी संवाद साधताना त्यांनी आपल्या या वेदना बोलून दाखविल्या.

हे ही वाचा:

हरियाणात काँग्रेसला झटका, सोनीपतचे महापौर निखिल मदान यांचा भाजपात प्रवेश!

अनेक महिने बर्फात दबलेले तीन जवानांचे मृतदेह लष्कराला सापडले !

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह नऊ जणांविरुद्ध तक्रार

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरबद्दल पंतप्रधान कार्यालयाने मागवला अहवाल

ते म्हणाले की, ही घटना घडल्यावर जेव्हा मला सकाळी पावणे सातला फोन आला तेव्हा मी उडालो. मला मोठा धक्का बसला. मी पोलिस मित्रांना फोन केला. एका पोलिस अधिकाऱ्याचा नंबर मित्राकडून मिळाला पण ते उचलत नव्हते. मित्रानेच मग फोन केला तेव्हा प्रमुख अधिकारी तिथे पोहोचले होते. एवढ्या सकाळी सगळे अधिकारी पोहोचल्यामुळे वाटू लागले की, काहीतरी गडबड आहे. मग मी मीडियाला कळवले. सगळ्या मीडियाने ही बातमी कव्हर केले. मला सगळ्यांचे फोन येऊ लागले. मीडियाने ही बातमी घेतल्यामुळे आणि ती लावून धरल्यामुळे पोलिसांना धावपळ करावी लागली.

वाडकर म्हणतात की, हे हिट अँड रनचे प्रकरण नाही. हा खूनच आहे. एक व्यक्ती बोनेटवर पडलेला आहे, हे माहीत असूनही त्याने तिला फरफटत नेले. पुढे गाडी थांबवली आणि त्याने स्वतःची जागा बदलली. आपल्या जागेवर ड्रायव्हरला बसवले. तेव्हाच गाडी मागे नेताना कावेरीच्या अंगावरून नेली. किती हा क्रूरपणा.

वाडकर म्हणतात की, फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांनी मला फोन करून सांत्वन केले. त्यांनाही या घटनेचे गांभीर्य लक्षात आले. अनेकांनी मला मदत करण्याची तयारी दर्शविली. राजेंद्र शिरोडकर यांनी यासंदर्भात खटला लढविण्याची तयारीही दाखविली.

वाडकर म्हणतात की, खरे तर, मोटार वेहिकल कायदाच बदलायला हवा. कुणीही चिरडून जाते आणि त्याला काहीही होत नाही. त्या मिहीर शहाच्या बापाला जामीनच मिळाला. त्याच्या बहिणी, आई यांनाही सोडले. त्यांना का सोडण्यात आले. राजकीय दबाव आलेला आहे का? असा प्रश्न मनात येतो. ही निर्घृण हत्या करणाऱ्यांना कठोर शासन व्हायला हवे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा