पुणे शहरातील हिंडवडीत आयटी हबमध्ये एका आयटी इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.महिलेचा मृतदेह एका लॉजमध्ये सापडल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली.या प्रकरणी पोलिसांकडून आरोपी प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील एका लॉजमध्ये ही धक्कादायक घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला आणि तिचा प्रियकर गेल्या दोन दिवसांपासून एका लॉजमध्ये थांबले होते.यानंतर आयटी इंजिनिअर असलेल्या या महिलेवर तिच्या प्रियकराने गोळीबार करत तिची हत्या केली आणि आरोपी मुंबईच्या दिशेने पसार झाला.
हे ही वाचा:
नितीश कुमार बिहारचे नवव्यांदा मुख्यमंत्री
विंडीजच्या जोसेफने घेतले ७ बळी, गॅबावर ऑस्ट्रेलियाला केले पराभूत
चांदीच्या झाडूने केली जाणार प्रभू राम मंदिराच्या गर्भगृहाची स्वच्छता!
बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदी सम्राट चौधरी, विजय सिन्हा यांची वर्णी
आरोपी पुण्यावरून मुंबईच्या दिशेने फरार झाल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली.पुणे पोलिसांकडून मुंबई पोलिसांना लगेच अलर्ट करण्यात आले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी नाकाबंदी करत आरोपीला पिस्टलसह अटक केली. आरोपीला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पुणे पोलीस आता आरोपीची चौकशी करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ निगम असे आरोपीचे नाव असून तो लखनऊमधील रहिवासी आहे.हे दोघेही आयटी कंपनीत इंजिनिअर होते.हे दोघे दोन दिवसापासून लॉजमध्ये राहत होते.त्यानंतर आरोपी ऋषभ याने महिलेची हत्या करून मुंबईला फरार झाला.मात्र, मुंबई पोलिसांच्या तावडीत आरोपी सापडला.दरम्यान, प्रेम प्रकरणातून त्याने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.याबाबत अधिक तपास हिंजवडी करत आहेत.