ढाकामधील इस्कॉनच्या केंद्राला समाजकंटकांकडून आग; मूर्ती, साहित्य जाळून खाक

इस्कॉनचे कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास यांनी दिली माहिती

ढाकामधील इस्कॉनच्या केंद्राला समाजकंटकांकडून आग; मूर्ती, साहित्य जाळून खाक

बांगलादेशमधील हिंसाचाराच्या घटना थांबण्याची चिन्हे दिसत नसून तेथील हिंदूंना आणि त्यांच्या श्रद्धास्थानांना वारंवार लक्ष्य केले जात आहे. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतनाने (इस्कॉन) शनिवारी आरोप केला की, बांगलादेशची राजधानी ढाका येथील त्यांचे केंद्र जाळण्यात आले.

इस्कॉनचे कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास यांनी एका एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, “बांगलादेशमध्ये इस्कॉन नमहट्टा सेंटर जळून खाक झाले. श्री श्री लक्ष्मी नारायण यांच्या देवता आणि मंदिरातील सर्व वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. हे केंद्र ढाका येथे आहे. पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान, तुरग पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या धोर गावात असलेल्या हरे कृष्ण नमहट्टा संघाच्या अंतर्गत येणाऱ्या श्री श्री राधा कृष्ण मंदिर आणि श्री श्री महाभाग्य लक्ष्मी नारायण मंदिराला समाजकंटकांनी आग लावली.”

माहितीनुसार, इस्कॉन सेंटरमध्ये लक्ष्मी नारायण यांच्या मूर्तीचेही नुकसान झाले आहे. तर, मंदिरात ठेवलेले उर्वरित साहित्यही जळून खाक झाले. बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने हल्ले होत असून अनेक हिंदू मंदिरांना कट्टरवाद्यांकडून लक्ष्य केले जात आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशातील अंतरिम सरकारच्या काळात बांगलादेशात अल्पसंख्याकांवर, विशेषतः हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराच्या वाढत्या घटनांना भारतात विरोध वाढत आहे. इस्कॉनशी संबंधित असलेल्या चिन्मय कृष्णा दास यांना अटक केल्यानंतर बांगलादेशातील वातावरण चिघळले आहे. हिंदू समाजावर कट्टरतावाद्यांचे हल्ले वाढले आहेत. ज्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशमध्ये संयुक्त राष्ट्र शांती मिशन तैनात करण्याची विनंती केली होती.

हे ही वाचा:

मायावती काँग्रेस, सपावर भडकल्या; मुस्लीम मतदारांना खुश करण्याचे लाचार प्रयत्न

नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, विरोधी आमदारांचा शपथ घेण्यास नकार

“विजयी मतांमध्ये एकही मुस्लीम मत नाही; मी हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मतदारासंघाचा आमदार”

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कळसाला मिळणार सुवर्ण झळाळी!

चिन्मय कृष्ण दास यांना २५ नोव्हेंबर रोजी ढाका येथे देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. हिंदू समुदायाच्या रॅलीमध्ये चिन्मय दास आणि इतरांवर बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करून ३१ ऑक्टोबर रोजी स्थानिक राजकारण्याने केलेल्या तक्रारीनंतर ही अटक करण्यात आली. त्यानंतर बांगलादेशातील परिस्थिती पुन्हा तणावाची बनली आहे.

Exit mobile version